जळगावात भाजप नेत्यांविरोधात जोडो मारो  | पुढारी

जळगावात भाजप नेत्यांविरोधात जोडो मारो 

जळगाव: पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजप नेत्यांनी एकेरी शब्दात टीका केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगाव शहरतर्फे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर, भाजपा कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध नाेंदविण्यात आला.

राष्ट्रवादीने बेताल वक्तव्य बंद न केल्यास सुधीर मुनगंटीवार व गोपीचंद पाडळकर यांना जळगाव जिल्ह्यात येण्यास बंदी घालण्यात येईल, असा इशारा आंदोलन कर्त्यांकडून देण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्हाध्यक्ष ॲड रवींद्र पाटील, प्रदेश सरचिटणिस नामदेव चौधरी, प्रदेश चिटणीस इजाज मलिक, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, युवक शहर जिल्हाध्यक्ष रिंकू चौधरी, महिला महानगराध्यक्ष मंगला पाटील, वाल्मिक पाटील, प्रतिभा शिरसाठ, राजू मोरे, मजहर पठाण, डॉ.रिझवान खाटीक, रमेश पाटील, ॲन्ड सचिन पाटील, वर्षा राजपुत, सुमन बनसोडे, कलाबाई शिरसाठ, अमोल कोल्हे, दत्तात्रय सोनवणे, सुशील शिंदे, रहीम तडवी, संजय चव्हाण, अशोक सोनवणे, साहील पटेल, आकाश हिवाळे, सचिन साळुंखे, विनोद धमाले, सुहास चौधरी, हितेश जावळे, पंकज तनपुरे, चंद्रमणी सोनवणे, भाला तडवी, गणेश निकम आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button