PM Modi on Climate Change : जागतिक हवामान बदलाच्या समस्येवर भारताकडे रोडमॅप : पंतप्रधान नरेंद्र मोदी | पुढारी

PM Modi on Climate Change : जागतिक हवामान बदलाच्या समस्येवर भारताकडे रोडमॅप : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : PM Modi on Climate Change : वर्तमानाची गरज आणि भविष्याच्या द़ृष्टिकोनात संतुलन साधत पर्यावरण संरक्षण आणि जागतिक हवामान बदलाच्या स्पष्ट रोडमॅप घेऊन भारत वाटचाल करत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी म्हटले आहे.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला आभासी पद्धतीने संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, एकदा वापरात येणार्‍या प्लास्टिकच्या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी 2018 पासूनच देश दोन पातळीवर काम करीत आहे. एकीकडे देशात एकदा वापरात येणार्‍या प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे, तर दुसरीकडे प्लास्टिक कचर्‍यावर प्रक्रिया बंधनकारक करण्यात आले आहे. देश विकासासाठी इतर क्षेत्राप्रमाणे पर्यावरणावरही विशेष लक्ष ठेवून आहे. Climate Change

PM Modi on Climate Change : इको टूरिझमला प्रोत्साहन मिळेल

गरिबांना मदत करताना भविष्यातील इंधनाची आवश्यकता लक्षात घेत मोठे पावले उचलण्यात आले असल्याचे पंतप्रधान म्हणाले. गत 9 वर्षांत भारताने हरित आणि स्वच्छ ऊर्जेवर विशेष लक्ष केंद्रित केले असल्याचे देखील पंतप्रधान म्हणाले. जलसंवर्धनासाठी केंद्राची रामसर योजनामुळे भविष्यात इको टूरिझमला प्रोत्साहन मिळेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. कार्यक्रमातून पंतप्रधानांनी इंदूरमधील सिरपूर आणि यशवंत सागर तलावाचे निरीक्षण केले.

हे ही वाचा :

Afghanistan News : अफगाणिस्तानात 80 विद्यार्थिनींना पाजले विष

Odisha Train Accident : सदोष रुळांमुळे 289 रेल्वे अपघात

Back to top button