Afghanistan News : अफगाणिस्तानात 80 विद्यार्थिनींना पाजले विष | पुढारी

Afghanistan News : अफगाणिस्तानात 80 विद्यार्थिनींना पाजले विष

काबूल, वृत्तसंस्था : Afghanistan News : अफगाणिस्तानच्या उत्तर प्रांतातील दोन वेगवेगळ्या प्रकरणी प्राथमिक शाळांतील 80 विद्यर्थिनींना विष पाजल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबतची माहिती परिसराच्या शिक्षण अधिकार्‍यांनी दिली. 2021 मध्ये अफगाणिस्तानात तालिबानी राजवट प्रस्थापित झाल्यानंतर अशा प्रकारची ही भयंकर घटना आहे. तालिबानने यापूर्वी देशातील मुलींना सहावीच्या पुढे शिकण्यास बंदी घातली आहे. ज्या शाळांतील मुलींना विष पाजण्यात आले आहे त्या शाळा सर-ए-पुल प्रांतातील आहेत.

दोन शाळा जवळजवळ आहेत. एका पाठोपाठ एका शाळेला लक्ष केले जात आहे. सर-ए-पुल प्रांताच्या शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, याप्रकरणाची चौकशी केली जात असून मुलींना कोणी विष दिले हे अद्याप समजलेले नाही. कोणी तरी त्रयस्थांनी हे विष दिल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले असून या सर्व मुली सहावीच्या वर्गातील आहेत. अफगाणिस्तानात अशा प्रकारची घटना 2015 मध्ये घडली होती.

अहमदनगरमध्ये उरूस मिरवणुकीत झळकले औरंगजेबाचे फोटो

अकरावीसाठी 14 जूनपासून प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया

Back to top button