Foxconn लवकरच कर्नाटकात आयफोन्सचे उत्पादन सुरु करणार, ५० हजार नोकऱ्यांची संधी | पुढारी

Foxconn लवकरच कर्नाटकात आयफोन्सचे उत्पादन सुरु करणार, ५० हजार नोकऱ्यांची संधी

बंगळूर, पुढारी ऑनलाईन : ॲपल इंकची (Apple Inc) पुरवठादार असलेली फॉक्सकॉन कंपनी एप्रिल २०२४ पर्यंत कर्नाटकमध्ये आयफोनचे उत्पादन सुरू करणार आहे. या फॅक्टरीसाठी जमीन १ जुलैपर्यंत फॉक्सकॉनला सुपूर्द केली जाईल, असे कर्नाटक सरकारकडून गुरुवारी सांगण्यात आले. तसेच १३० अब्ज रुपयांच्या (१.५९ अब्ज डॉलर) या प्रकल्पातून सुमारे ५० हजार नोकऱ्या (foxconn careers) निर्माण होण्याची अपेक्षा राज्य सरकारने व्यक्त केली आहे. (foxconn karnataka)

Foxconn ही जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक कंपनी आहे. कर्नाटकची राजधानी आणि टेक हब बंगळूर जवळील देवनहळ्ळी (foxconn devanahalli) येथील प्लांटमध्ये वर्षाला २ कोटी आयफोन तयार करण्याचे लक्ष्य फॉक्सकॉनने ठेवले आहे.

कोरोनाच्या कडक निर्बंधांमुळे चीनमधील Foxconn चे उत्पादन विस्कळीत झाले होते. यामुळे आता Apple चीन पासून दूर भारतात उत्पादन घेणार आहे. चीन आणि अमेरिका यांच्यातील तणावपूर्ण संबंधामुळे टेक दिग्गज कंपनी ॲपल त्याच्या व्यवसायाला होणारा फटका टाळण्यावर विचार करीत आहे.

तैवानची कॉन्ट्रॅक्ट मॅन्यूफॅक्चर फॉक्सकॉनला (Foxconn) अॅपल इंक (Apple Inc) साठी एअरपॉड्स बनवण्याची ऑर्डर मिळाली आहे. तसेच या कंपनीने आता वायरलेस इयरफोन्स तयार करण्यासाठी भारतात फॅक्टरी उभारण्याची योजना आखली आहे.

या करारामुळे जगातील सर्वात मोठी कॉन्ट्रॅक्ट इलेक्ट्रॉनिक्स निर्माता आणि सर्व iPhones पैकी ७० टक्के असेंब्लर असलेली Foxconn प्रथमच AirPod चा पुरवठा करणार आहे. सध्या एअरपॉड्स चिनी पुरवठादारांकडून बनवले जातात. पण आता ही कंपनी Apple ची AirPod पुरवठादार बनणार आहे. विशेष म्हणजे हे उत्पादन चीनपासून दूर भारतात घेतले जाणार आहे.

हे ही वाचा :

Back to top button