पुढारी ऑनलाईन डेस्क : चीनमधील फॉक्सकॉन अॅपल प्रकल्पातील (Foxconn Apple Plant) कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर 20 हजारहून अधिक कर्मचाऱ्यांनी काम सोडले आहे. त्यापैकी बहुतेक कर्मचारी नव्याने कामावर रुजू झाले होते. या सर्व कर्मचाऱ्यांनी Apple पुरवठादार फॉक्सकॉनचा चीनमधील झेंगझोऊ प्रकल्प सोडला आहे, अशी माहिती फॉक्सकॉनमधील सूत्रांनी शुक्रवारी (दि. २५) रॉयटर्सला दिली.
जगातील सर्वात मोठ्या आयफोन कंपनीतील (Foxconn Apple Plant) कामगारांच्या अशांततेमुळे कंपनीचे नोव्हेंबरच्या अखेरीस पूर्ण उत्पादन पुन्हा सुरू करण्याचे कंपनीला लक्ष्य साधता येणार नाही. फॉक्सकॉनच्या अॅपल प्रकल्पातून मोठया संख्येने कर्मचारी बाहेर पडले तरी सध्याच्या उत्पादनावर कोणताही परिणाम झालेला नाही. तसेच व्यवस्थापनाने नवीन कर्मचार्यांना काम करण्यापूर्वी ऑनलाइन प्रशिक्षण घेणे आवश्यक केले आहे.
फॉक्सकॉनने ऑक्टोबरमध्ये कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना राबविल्यानंतर बोनस आणि उच्च पगाराचे कामगारांना आश्वासन देत या महिन्याच्या सुरुवातीला हायरिंग ड्राइव्ह सुरू केला. प्रतिबंधांमुळे कंपनीला बर्याच कर्मचार्यांना वेगळे करण्यास भाग पाडले आणि प्लांटच्या परिस्थितीमुळे अनेकांना काम सोडण्यास प्रवृत्त केले.
दरम्यान, चीनमध्ये कोविड संसर्गाची विक्रमी रुग्ण संख्या नोंदवली जात आहे. नागरिकांना कडक लॉकडाऊनचा सामना करावा लागत आहे. ज्यामुळे देशभरातील नागरिकांमध्ये निराशा पसरली आहे. तर दुसरीकडे यामुळे काही कर्मचार्यांमध्ये दळणवळणाच्या समस्या निर्माण झाली आहे. तर फॉक्सकॉन व्यवस्थापनावरील कर्मचाऱ्यांचा अविश्वासही वाढला आहे.
हेही वाचलंत का ?