पुढारी ऑनलाईन : मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे ॲपलच्या भारतातील पहिल्या रिटेल स्टोअरचे आज (दि.१८) उद्धाटन करण्यात आले. Apple चे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक यांनी आज सकाळी या स्टोअरचे उद्धाटन केले. दरम्यान, Apple कंपनीच्या चाहत्यांनी स्टोअरच्या बाहेर लांबलचक रांगा लावल्या होत्या. ॲपलचे भारतातील दुसरे रिटेल स्टोअर हे गुरुवारी (दि.२०) राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सुरू होणार आहे.
मुंबईमधील पहिल्या Apple कंपनी स्टोअरच्या उद्धाटन झाल्यानंतर यूजर्संनी घोषणा देत उत्साह साजरा केला. दरम्यान ॲपलचे भारतातील सीईओ टीम कूक यांची भेट घेतली. तसेच त्यांच्यासोबत अनेकांनी सेल्फी देखील घेतले. याप्रसंगी पहिली प्रतिक्रिया देताना टीम कूक यांनी मुंबईतील ऊर्जा उल्लेखनीय असल्याचे म्हटले आहे. आम्ही Apple BKC हे भारतातील आमचे पहिले स्टोअर उघडण्यास खूप उत्सुक आहोत, असे म्हटले आहे.
मुंबईतील बीकेसी येथे भारतातील पहिल्या ॲपल स्टोअरच्या उद्घाटनाच्या वेळी एका ग्राहकाने त्याचे जुने मॅकिंटॉश क्लासिक मशीन घेऊन आल्याचे पाहून ॲपलचे सीईओ टीम कूक हे आश्चर्य चकित झाले. त्यांनी या ग्राहकाचे स्वागत केले.