रायगड : ‘शेतामध्ये सोनं सापडलं, घेता का !’ | पुढारी

रायगड : 'शेतामध्ये सोनं सापडलं, घेता का !'

नागोठणे; महेंद्र माने : शेतामध्ये नांगरणी करताना जुने सोने मिळाले असल्याचे सांगून ते सोने बाजारभावाच्या अर्ध्या किमतीत विकण्याचे आमिष दाखवून १३ लाख ३० हजारांची फसवणूक करण्याची घटना रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथे घडली आहे. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून १३ लाख ३० हजार रुपयांची रक्कम जप्त केली आहे.

शेतामध्ये नांगरणी करताना जुने सोने मिळाले असल्याचे सांगून ते सोने बाजारभावाच्या अर्ध्या किमतीत विकण्याचे आमिष दाखवून फसवणूकप्रकरणी तपास करताना रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकातील हेड कॉन्स्टेबल जितेंद्र चव्हाण यांनी या गुन्ह्यातील आरोपीतांचे मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले. पोलीस पथकाने या गुन्ह्यातील संशयित शिवाजी विठ्ठल मोहिते (५१ वर्षे, रा. लोणी, ता. किनवट, जि. नांदेड), वशिकला कांतीलाल पवार (६५ वर्षे, रा. सावदरवाडी, ता. परंडा, जि उस्मानाबाद), अनिता रजनीकांत भोसले (४० वर्षे, रा. बुरुडगाव, तंबेमळा, ता. जि. अहमदनगर) या तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्याचेकडे गुन्ह्यांचे अनुषंगाने सखोल चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली. यातील आरोपींनी गुन्ह्यात फसवणूक केलेली रोख रक्कम १३ लाख ३० हजार रुपये जप्त करण्यात आली

Back to top button