T-20 World Cup : तर यावेळी पाकिस्तानचा टी-20 वर्ल्ड कप निश्चित ! | पुढारी

T-20 World Cup : तर यावेळी पाकिस्तानचा टी-20 वर्ल्ड कप निश्चित !

पुढारी ऑनलाईन डेस्क

टी-२० वर्ल्ड कपची (T-20 World Cup) रणधुमाळी सुरु झाली आहे. प्रत्येक भारतीयासह जगभरातील क्रिकेटप्रेमी रविवारची  आतुरतेने वाट पाहत आहे. कारण त्या दिवशी कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये टी-२० वर्ल्ड कपमधील  महामुकाबला होणार आहे. या सामन्यासाठी टीव्हीवाल्यांपासून ते सोशल मीडियापर्यंत चांगलीच हवा निर्माण झाली आहे.

भारताने पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत पाचवेळा धुळ चारली असली, तरी या संघाला कमी लेखून नक्कीच चालणार नाही. या संघामध्ये दादा संघाना हरवण्याची क्षमता आहे. त्यामुळे या संघाकडे आणि पाच हुकमी खेळाडूंच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. टी 20 विश्वचषक 2021 मध्ये पाकिस्तान सर्वात धोकादायक मानला जात आहे. कारण युएईमधील खेळण्याचा अनुभव.

पाकिस्तान 2009 टी-20 वर्ल्ड कपचा (T-20 World Cup) विजेता आहे. या संघाच्या नजरा आता दुसऱ्या टी-20 च्या विजेतेपदाकडे लागल्या आहेत. T-20 World Cup 2021 यावेळी यूएईमध्ये खेळला जात आहे. यूएई हे पाकिस्तान संघाचे दुसरे घर आहे. या ठिकाणी पाकिस्तानी खेळाडू खूप क्रिकेट खेळले आहेत. या T-20 World Cup मध्ये पाकिस्तान संघाला ब गटात स्थान देण्यात आले आहे. जिथे न्यूझीलंड, भारत आणि अफगाणिस्तानचा सामना करेल.

स्टार फलंदाज बाबर आझम संघाचा कॅप्टन आहे. विश्वचषकासाठी 15 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. ज्यात तरुण आणि अनुभवी खेळाडूंचे मिश्रण आहे. वरिष्ठ खेळाडूंमध्ये शोएब मलिक, मोहम्मद हफीज यांचा समावेश आहे, तर शाहीन आफ्रिदी, हसनैन, हैदर अली या तरुण चेहऱ्यांकडूनही चांगली कामगिरी अपेक्षित आहे, पण पाकिस्तानमध्ये असे पाच खेळाडू आहे ज्यांची कामगिरी संघासाठी खूप महत्वाची असेल. जर हे पाच खेळाडू आपली भूमिका निभावण्यात यशस्वी झाले. तर तुम्हाला माहीत आहे का पाकिस्तान दुसरे टी-20 विश्वचषक (T-20 World Cup) विजेतेपदही उंचावू शकतो.

बाबर आझम

बाबर आझम तिन्ही फॉरमॅटमधील सर्वोत्तम फलंदाज आहे. तो जागतिक टी-20 क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा फलंदाज आहे. बाबर आझम ही पाकिस्तानची सर्वात मोठी आशा आहे. यावेळी त्याला दोन मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. कर्णधार आणि फलंदाजी. त्याच्याकडे शोएब मलिक, सर्फराज आणि हाफिज कर्णधारपदासाठी मदत करतील. बाबरला फलंदाजीत आपली ताकद दाखवावी लागेल. मात्र, यंदा पाकिस्तानच्या कर्णधाराने चांगली कामगिरी केली आहे.

बाबर आझमने 14 टी-20 सामन्यांमध्ये 38 च्या सरासरीने 523 धावा केल्या आहेत. ज्यात एक शतक आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे. अलीकडेच राष्ट्रीय टी-20 चषकातही बाबर आझमची बॅट तळपली आहे. या घरगुती टी-20 स्पर्धेच्या सहा सामन्यांत त्याने 72 च्या सरासरीने 286 धावा केल्या. यापूर्वी पीएसएल 2021 चा दुसरा टप्पा यूएईमध्येच खेळला गेला होता. आणि बाबर आझम स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. (T-20 World Cup)

मोहम्मद रिझवान

मोहम्मद रिझवान अप्रतिम यष्टीरक्षक फलंदाज आहे. पाकिस्तानमधील बाबरनंतर दुसरा सर्वांत विश्वासार्ह आणि हुशार फलंदाज म्हणून मोहम्मद रिझवानकडे पाहिले जाते. बाबर आझमसह डावाची तो सुरुवात करतो. यावर्षी रिझवानने टी-20 मध्ये सर्वाधिक धावाही केल्या आहेत. त्याने 14 टी 20 डावात 94 च्या सरासरीने 752 धावा केल्या आहेत. ज्यात एक शतक आणि सात अर्धशतके समाविष्ट आहेत.

मोहम्मद हफीज

पाकिस्तानच्या फलंदाजीच्या फळीमध्ये आक्रमक फलंदाज मोहम्मद हफीज नसला, तरी मधल्या फळीत एक अनुभवी फलंदाज नक्कीच आहे. मधल्या षटकांत हाफिजला झटपट धावा कराव्या लागतील. यासोबत त्याला फिनिशरची भूमिकाही पार पाडावी लागेल. आसिफ अली किंवा मोहम्मद नवाज मोठे फटके मारण्यात पटाईत आहेत. पण हाफिजइतके ते विश्वासार्ह नाहीत. मोहम्मद हाफिजला शेवटपर्यंत डाव कसा न्यायचा हे माहित आहे आणि त्याला कसे फिनीश करायचे हे देखील माहीत आहे. त्याची सध्या स्ट्राइक रेट आणि फॉर्म ही एकमेव समस्या आहे. (T-20 World Cup)

हसन अली

2021 साल हसन अलीसाठी खूप चांगले ठरले असून तो मस्त फॉर्ममध्ये आहे. कसोटीत धमाका केल्यानंतर तो टी-20 मध्येही चमकला. या वर्षी 10 डावांमध्ये हसन अलीने 15 च्या सरासरीने 17 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय हसन अलीनेही फलंदाजीला हातभार लावला आहे. सात डावांमध्ये 58 धावा आणि 207 चा स्ट्राईक रेट. यामुळेच बाबर आझमने डेथ ओव्हर्समध्ये हसन अलीला वरती पाठवायला सुरुवात केली आहे. जेणेकरून तो काही मोठे फटके मारून धावा करू शकेल.

हसन अली पाकिस्तानच्या वेगवान आक्रमणाचे नेतृत्व करेल. त्याला यूएईमध्ये खेळण्याचा खूप अनुभव आहे. आतापर्यंत दुबई आणि अबू धाबीच्या खेळपट्टीवर त्याने एकूण 15 टी-20 विकेट घेतल्या आहेत.

शाहीन शाह आफ्रिदी

गेल्या काही वर्षात बाबर आझमनंतर जर कोणत्याही पाकिस्तानी खेळाडूने सर्वात जास्त सुधारणा केली असेल तर तो शाहीन शाह आफ्रिदी आहे. 21 वर्षीय या वेगवान गोलंदाजाला विकेट कशी घ्यायची हे माहीत आहे. शाहीनला गती आहे. अचूक यॉर्कर आणि बाउंसर गोलंदाजी करायची ते माहित आहे. अलीकडील कामगिरी पाहता शाहीन शाह आफ्रिदीने राष्ट्रीय टी-20 चषकात अप्रतिम गोलंदाजी केली आहे. केवळ सहा सामन्यांत 12 विकेट्स घेतल्या आणि स्पर्धेतील तिसरा आघाडीचा विकेट घेणारा गोलंदाज होता.

हे ही वाचलं का?

Back to top button