Ind vs pak T20 Match : भारताकडून हरला तर पाकिस्तानात यायचं नाही, पाक कॅप्टनला थेट धमकी | पुढारी

Ind vs pak T20 Match : भारताकडून हरला तर पाकिस्तानात यायचं नाही, पाक कॅप्टनला थेट धमकी

पुढारी ऑनलाईन डेस्क

Ind vs pak T20 Match : भारत आणि पाकिस्तान यांच्यात २४ ऑक्टोबरला T20 विश्वचषक निमित्ताने सामना रंगणार आहे. या सामन्याकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले आहे. हा सामना होणार म्हटल्यावर दोन्ही देशातील चाहते भारावून गेले आहेत. दरम्यान पाकिस्तानच्या एका चाहत्याने थेट पाकिस्तान कर्णधार बाबर आझमला धमकी दिली आहे. बाबर आझमच्या ट्विटर पोस्टवर ही धमकी दिली आहे.

२४ ऑक्टोबर रोजी भारतासोबत होणारा सामना जिंकला नाही तर तुम्हाला घरी जाऊ देणार नाही, अशा आशयाची पोस्ट चाहत्याने केली आहे. बाबर आझमने आगामी विश्वचषकाच्या स्पर्धेसाठी ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांकडून शुभेच्छा मागितल्या. यावर काही चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या तर काही चाहत्यांनी तुम्ही जर भारताविरूद्ध सामना जिंकला नाही तर मायदेशात यायचं नाही.

तर एका चाहत्याने थेट घरात जाऊ देणार नाही असे ट्विट केले. काही चाहत्यांनी व्हिडीओ टाकत ही तुमच्यासाठी शेवटची संधी असल्याचे सांगितले. आतापर्यंत टी-२० विश्वचषकात पाचवेळा आमनेसामने झाले आहेत. यामध्ये पाकिस्तानला एकदाही विजय मिळवता आलेला नाही.

आझम खानच्या म्हणण्यानुसार ते दुबईमध्ये मागील तीन वर्षांपासून क्रिकेटचे सामने खेळत आहेत. यामुळे त्यांना तेथील खेळपट्टीची सवय झाली आहे. याचा आम्हाला चांगला फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तो म्हणाला की, सामन्याच्या दिवशी जो संघ अधिक चांगला खेळेल तोच जिंकेल. मला वाटते की आम्ही जिंकू.

Ind vs pak T20 Match : पाकिस्तानच्या एका उद्योगपतीकडून ऑफर

भारतासोबत विश्वचषकातील सामना जिंका आणि पाहिजे तेवढी रक्कम कोऱ्या चेकवर लिहा, अशी थेट ऑफर एका पाकिस्तानी उद्योगपतीने दिली. अशी माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख रमीज राजा यांनी दिली. पाकिस्तान स्टॉक एक्स्चेंज येथे दिलेल्या भेटीदरम्यान रमीज राजा यांनी ही माहिती दिली.

तर पाकिस्तान क्रिकेट मंडळ आयसीसीच्या निधीवर अवलंबून

पाकिस्तान क्रिकेट मंडळाचा उदरनिर्वाह हा आयसीसीकडून येणाऱ्या ५० टक्के निधीतून चालतो. याचबरोबर आयसीसीसाठी येणारा ९० टक्के निधी हा भारतीय क्रिकेट मंडळाकडून येतो.

भारताकडून हा निधी यायचा बंद झाल्यास पाकिस्तान क्रिकेट मंडळाची परिस्थिती बिकट होईल अशी भितीही रमीझ राजा यांनी व्यक्त केली. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेटला बळकट करण्याचा माझा प्रयत्न करणार असल्याची माहिती राजाने दिली.

भारतीय संघ

विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्थी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी; राखीव खेळाडू – श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर व दीपक चहर.

पाकिस्तानचा संघ

बाबर आझम, आसीफ अली, खुशदील शाह, मोहम्मद हाफिज, सोहैब मक्सूद, आझम खान, मोहम्मद रिझवान, इमाद वासीम, मोहम्मद नवाझ, मोहम्मद वासीम, शाबाद खान, हॅरीस रौफ, हसन अली, मोहम्मद हस्नैन, शाहिन शाह आफ्रिदी.

हे ही वाचलं का ?

Back to top button