मुंबईला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पोलीस यंत्रणा सतर्क, एकाला घेतले ताब्यात | पुढारी

मुंबईला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पोलीस यंत्रणा सतर्क, एकाला घेतले ताब्यात

मुंबई : पुढारी वृत्तसेवा मुंबईला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारे एक ट्विट मुंबई पोलिसांना आल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली. पोलिसांनी या ट्विटची दखल घेत तपास करुन एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलला (सोमवार) सकाळी ११ वाजता टॅग करत “मी लवकरच मुंबईत स्पोट करणार आहे”, असा धमकीचा मेसेज पोस्ट करण्यात आला. पोलिसांनी या ट्विटरवर तात्काळ कारवाई सुरु करत ज्या ट्विटर हँडलवरून ही पोस्ट करण्यात आली होती. त्याला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

‘ताज हॉटेल पे आतंकवादी हल्या हुआ वो लोग परेशान करते है, अजमेरसे आपको फोन आयेगा… असा मुंबईवर झालेल्या २६/११ च्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करणारा एक कॉल रविवारी रात्री ११ वाजून १७ मिनिटांनी मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षातील क्राईम टेबलवर आला. या कॉलची नोंद करुन पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पुढील तपास सुरू केला आहे.

हेही वाचा : 

Back to top button