राष्‍ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज शरद पवार यांची भेट घेणार | पुढारी

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज शरद पवार यांची भेट घेणार

पुढारी ऑनलाईन : राष्‍ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची काल ईडीने तब्‍बल साडेनऊ तास चौकशी केली. त्‍या पार्श्वभूमीवर आज (मंगळवार) जयंत पाटील हे राष्‍ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची १०:३० वाजता सिल्‍व्हर ओक या ठिकाणी भेट घेणार आहेत. या भेटीत ते ईडीच्या चौकशी विषयी माहिती देतील.

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आयएल अँड एफएस प्रकरणात ईडीने तब्‍बल साडेनऊ तास कसून चोकशी केली. या कारवाईच्या विरोधात राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्‍यभर जोरदार निदर्शने केली. दुपारी सव्वाबाराला चौकशीसाठी ईडी कार्यालयात गेलेल्‍या जयंत पाटील यांची रात्री पावणे दहा वाजता सुटका झाली. या चौकशीत काही विशेष नव्हते. ईडी अधिकाऱ्यांनी विचारलेल्‍या प्रश्नांना आपण उत्‍तरे दिली, असे जयंत पाटील यांनी सांगितले. मात्र, या चौकशीनंतर त्‍यांच्यावरही इडीच्या कारवाईची टांगती तलवार आहे.

हेही वाचा :  

Back to top button