पुणे : मिक्सरची दुचाकीला धडक; महिला जागीच ठार | पुढारी

पुणे : मिक्सरची दुचाकीला धडक; महिला जागीच ठार

पुणे /कात्रज; पुढारी वृत्तसेवा : कात्रजवरून स्वारगेटच्या दिशेने जाणार्‍या दुचाकीला रेडी मिक्सरने धडक दिली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेली महिला जागीच ठार झाली. दुपारी बाराच्या सुमारास सातारा रस्त्यावरील भारती विद्यापीठ हॉस्पिटलसमोर हा अपघात झाला.

वंदना भरेकर या दुचाकीवरून त्यांच्या चुलती दुर्गा कुंडलिक जावळकर यांना घेऊन कात्रजकडून स्वारगेटच्या दिशेने जात असताना भारती विद्यापीठ हॉस्पिटलसमोर पाठीमागून येणार्‍या मिक्सरने (एम एच 12 यू एम 2402) धडक दिली. यामध्ये जावळकर यांच्या डोक्यावरून मिक्सरचे पुढील चाक गेल्याने त्यांचा मृत्यू झाला, तर भरेकर यांना किरकोळ दुखापत झाली. मिक्सरचालक कन्नूस्वामी देवर (वय 62, रा. कात्रज) याला भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button