आता चक्क अंतराळात करता येणार लग्न! | पुढारी

आता चक्क अंतराळात करता येणार लग्न!

वॉशिंग्टन : आपल्या लग्नाचा दिवस संस्मरणीय व्हावा यासाठी अनेक लोक अनेक प्रकार करीत असतात. (खरे तर तसेही हा दिवस आयुष्यभर लक्षात राहतोच, त्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत!) कुणी उंच पर्वतशिखरावर लग्न करतात तर कुणी चक्क पाण्याखाली. कुणी विमानात लग्न करतात तर कुणी हॉट एअर बलूनमध्ये! मात्र आता त्याच्याही पुढे चार पावले चालून ‘सप्तपदी’ घेण्याची सोय निर्माण झाली आहे. आता चक्क अंतराळातही लगीनगाठ बांधून घेता येऊ शकेल. पृथ्वीपासून तब्बल एक लाख फूट उंचीवर लग्न करण्याची ही सोय ‘स्पेस पर्स्पेक्टिव्ह’ या कंपनीने उपलब्ध करून दिली आहे.

यासाठी ही कंपनी प्रशस्त खिडक्यांनी सुसज्ज कार्बन-न्यूट्रल फुगा तयार करणार आहे जो पृथ्वीच्या कक्षेत पाठवला जाईल. या प्रशस्त खिडक्यांमुळे प्रवाशांना पृथ्वीच्या सुंदर द़ृश्यांचा आनंद घेता येणार आहे. अशाप्रकारे अवकाशात लग्न करण्याची संधी ही कंपनी देणार आहे. कंपनीद्वारे स्पेस बलूनने नेपच्यून अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेत प्रक्षेपित करते आणि कार्बन फूटप्रिंटचा वापर न करता अक्षय हायड्रोजनच्या मदतीने चालवले जाते. सहा तासांच्या अंतराळयान नेपच्यूनचे उड्डान सर्वात आश्चर्यकारक असणार आहे कारण हे पाहुण्यांना पृथ्वीपासून 1,00,000 फूट उंच घेऊन जाऊ शकते आणि पुन्हा खाली घेऊन येऊ शकते.

ही सुविधा 2024 पर्यंत सुरू करण्याची योजना आखली जात आहे आणि पहिली 1000 तिकिटांची विक्री देखील झाली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, लोक फ्लाईट दरम्यान पूर्ण आनंद घेऊ शकतात. कंपनीने आपल्या वेबसाईटवर म्हटले आहे की, “साहजिकच, आमच्या कॅप्सूलमध्ये अविस्मरणीय द़ृश्यांसह संपूर्ण सुसज्ज स्वच्छतागृह आहे. स्पेस लाऊंजमधून अंतराळायानाच्या सर्वात मोठ्या खिडक्यांमधून 360-डिग्रीमध्ये अंतराळातील आश्चर्यकारक दृश्यांचा आंनद घेता येईल. हायस्पीड वाय-फाय कनेक्शन तुम्हाला तुमचे कुटुंब आणि मित्रांना पृथ्वीवर परत आणण्यास मदत करेल.”

संबंधित बातम्या
Back to top button