Maharashtra political crisis : महाराष्ट्र सत्तासंघर्षावर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया | पुढारी

Maharashtra political crisis : महाराष्ट्र सत्तासंघर्षावर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : देशासह महाराष्‍ट्राचे लक्ष लागून राहिलेल्‍या महाराष्‍ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाला आज (दि.११) लागला. सर्वोच्‍च न्‍यायालयाने एकनाथ शिंदेसह १६ आमदारांना अपात्रेताचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असे सांगितल्याने मुख्यमंत्री शिंदेना हा मोठा दिलासा समजला जात आहे. निकालानंतर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. याला दिलासा म्हणता येणार नाही. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यायचा आहे. व्हीपची खातरजमा करून विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असे राऊत यांनी म्हटले आहे.

शिंदे सरकारला ‘सर्वोच्‍च’ दिलासा

देशासह महाराष्‍ट्राचे लक्ष लागून राहिलेल्‍या महाराष्‍ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल आज (दि.११ ) सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिला.  घटनापीठाने एकनाथ शिंदेसह १६ आमदारांच्‍या अपात्रतेसंदर्भातील निर्णय विधानसभा अध्‍यक्ष घेतील, असे स्‍पष्‍ट केले. या निर्णयामुळे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच गेल्‍या १० महिन्‍यांहून अधिक काळ सुरु असल्‍याच्‍या राजकीय सत्तासंघर्ष नाट्यावरही पडदा पडला आहे.

Back to top button