Supreme Court : आम्रपाली समुहाचे अनिल शर्मा यांचा जामीनअर्ज फेटाळला | पुढारी

Supreme Court : आम्रपाली समुहाचे अनिल शर्मा यांचा जामीनअर्ज फेटाळला

पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली : आम्रपाली समुहाचे (Amrapali Group) माजी अध्यक्ष अनिलकुमार शर्मा यांचा जामीनअर्ज सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) फेटाळून लावला आहे. घर खरेदी करण्यास इच्छुक असलेल्या हजारो लोकांची तुम्ही फसवणूक केलेली आहे. त्यामुळे तुमच्याबद्दल सहानुभूती दाखविण्याचे काही कारण नाही, अशी टिप्पणी न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांनी सुनावणीदरम्यान केली.

शर्मा हे मागील चार वर्षांपासून तुरुंगात बंद आहेत. वैद्यकीय कारणास्तव जामीन दिला जावा, असे सांगत त्यांनी जामीनअर्ज दाखल केला होता. याआधी याच कारणास्तव त्यांना काही आठवड्यांसाठी जामीन देण्यात आला होता. फसवणूक, गुन्हेगारी कट रचणे, हवालासहित अनेक गुन्हे त्यांच्याविरोधात दाखल आहेत.

रेरा कायद्याअंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आम्रपाली समुहाचे (Amrapali Group) नोंदणीपत्र काही वर्षांपूर्वी रद्द केले होते. आर्थिक गुन्हे विभाग, गंभीर गुन्हे तपास विभाग तसेच ईडीकडून शर्मा यांच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत.

Back to top button