Kohli vs Gambhir : गौतम गंभीरशी भांडण केल्याबद्दल विराट कोहली दंड भरणार नाही? कसं ते जाणून घ्या | पुढारी

Kohli vs Gambhir : गौतम गंभीरशी भांडण केल्याबद्दल विराट कोहली दंड भरणार नाही? कसं ते जाणून घ्या

पुढारी ऑनलाईन डेस्क : विराट कोहली (Virat Kohli) आणि गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यातील वादाला तीन दिवस उलटून गेले असले तरी त्या घटनेची अजूनही चर्चा रंगली आहे. आयपीएलमध्ये 1 मे रोजी लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) यांच्यात खेळला गेला होता. त्या सामन्यात कोहलीचा गंभीर आणि नविन उल हक यांच्याशी जोरदार भांडण झाले होते. (Kohli vs Gambhir)

आरसीबीने (RCB) तो सामना 18 धावांनी जिंकला होता. पण सामन्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) आणि गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यात जोरदार वाद झाला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दोघांनाही मोठा दंड ठोठावला आहे. (Kohli vs Gambhir)

या दोघांना 100 टक्के मॅच फीचा दंड ठोठावण्यात आल्याची चर्चा होती, पण गंमत म्हणजे विराट कोहली या दंडाची रक्कम भरावी लागणार नाही. विराटचा दंड कोण भरणार आणि गंभीरचा दंड त्याच्या स्वतःच्या खिशातून जाणार का? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. चला तर याबाबत रंजक माहिती समजून घेऊया. (Kohli vs Gambhir)

विराट कोहलीचा (Virat Kohli) पगार 15 कोटी रुपये आहे, जो आरसीबी त्याला दरवर्षी देते. आरसीबीला या मोसमात किमान 14 सामने खेळायचे आहेत, त्यामुळे विराटचा एका सामन्याचा पगार जवळपास 1.07 कोटी रुपये होतो. जर आरसीबी प्लेऑफमध्ये पोहोचला तर विराटची मॅच फी आणखी कमी होऊ शकते.

आरसीबीच्या (RCB) एका सूत्राने क्रिकबझला सांगितले की, खेळाडू ज्या संघासाठी खेळतात तो संघ त्यांच्या कोणत्याही दंडाची भरपाई करतो. आता याचा अर्थ असा आहे की विराटचा दंड त्याच्या खिशातून नाही तर आरसीबीच्या तिजोरीतून जाईल.

गंभीरच्या (Gautam Gambhir) बाबतीतही हेच पाहायला मिळते. गंभीरचा दंडाचा वाटा एलएसजी द्वारे भरला जाऊ शकतो. या दोघांशिवाय, युवा एलएसजीचा क्रिकेटर नवीन-उल-हक याला त्याच्या मॅच फीच्या 50 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे, या प्रकरणात त्याचा दंड देखील त्याचा संघ भरेला.

Back to top button