Sunil Gavaskar | फक्त एक कोटीचा दंड?, कोहली-गंभीरच्या वादावर सुनील गावस्कर संतप्त, बीसीसीआयला केलं हे आवाहन | पुढारी

Sunil Gavaskar | फक्त एक कोटीचा दंड?, कोहली-गंभीरच्या वादावर सुनील गावस्कर संतप्त, बीसीसीआयला केलं हे आवाहन

पुढारी ऑनलाईन डेस्क : विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात झालेला वाद ही आयपीएलच्या इतिहासातील लाजीरवाणी घटना आहे. ‘कोहली-गंभीर’ यांच्यातील बाचाबाचीवर अनेक माजी खेळाडूंनी आपले मत व्यक्त केले आहे. आता भारताचा माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. कोहली- गंभीर यांना बीसीसीआयने फक्त दंड केला, यापेक्षाही कडक शिक्षा करणे गरजेचे होते. त्यांना एक किंवा दोन सामन्यांमधून बाहेर काढायला पाहिजे होते. जेणेकरून याचा परिणाम इतर खेळाडू आणि त्यांच्या टीमवर झाला असता, असे गावस्करनी म्हटले आहे.

आयपीएलमध्ये विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील लढाईने सर्वांनाच चकित केले. त्यांच्या वादावर दोघांनीही असं करायला नको होतं, असं हरभजनने म्हटलं आहे. हरभजनने श्रीशांतसोबतच्या त्याच्या भांडणाचे उदाहरण सांगितले आणि त्याने जे केले त्याची मला लाज वाटत असल्याचेही त्यांनी म्हटले. त्याचवेळी आता सुनील गावस्करनीही या प्रकरणी आपले मत मांडले आहे. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गावस्कर म्हणाले की, ‘मैदानावर जे काही घडले ते धक्कादायक आहे. ते होऊ नये. बीसीसीआयने याबाबत कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. मी त्या घटनेचा व्हिडिओ पाहिला, मैदानावर काय घडले ते मला थेट पाहता आले नाही. पण जे काही पाहिलं ते दिसायला चांगलं नव्हतं, असे त्याने म्हटले आहे.

आक्रमकता दाखवायची तर खेळातून दाखवा

बीसीसीआयने केवळ दंड ठोठावून विराट आणि गंभीरला सोडून दिल्याने गावस्करनी नाराजी व्यक्त केली. यावर गावस्कर म्हणाले की, ‘१०० टक्के मॅच फी म्हणजे काय? जर कोहली आरसीबीसाठी १७ कोटी घेत असेल, याचा अर्थ जर त्याने १६ सामने खेळले तर ती १ कोटीची बाब आहे. जे खूप कमी आहे. तसेच त्यावेळी गंभीरची अवस्था काय होती हे मला माहीत नाही. त्याने पुन्हा असं होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. सामन्यात आक्रमकता दाखवायची असेल तर स्पर्धात्मक खेळ करून दाखवा. आम्ही खेळायचो तेव्हा आता दिसणारा आक्रमकपणा नव्हता.

गावस्करांचे बीसीसीआयला आवाहन

गावस्कर यांनी बीसीसीआयने विराट आणि गंभीर यांना केलेला दंड ही शिक्षा खूपच कमी आहे. बीसीसीआयने त्यांना कठोर शिक्षा द्यावी. माझ्या मते, दोघांनाही एक-दोन सामन्यांमधून काढून टाकायला हवे होते, जेणेकरून त्याचा खेळाडू आणि संघावरही परिणाम होऊ शकेल, असे गावस्करनी म्हटले आहे.

हेही वाचा : 

Back to top button