MS Dhoni Retirement: निवृत्तीवरून धोनीचे मोठे विधान, म्हणाला; ‘हा माझा शेवटचा आयपीएल हंगाम..’ | पुढारी

MS Dhoni Retirement: निवृत्तीवरून धोनीचे मोठे विधान, म्हणाला; ‘हा माझा शेवटचा आयपीएल हंगाम..’

पुढारी ऑनलाईन डेस्क : महेंद्रसिंग धोनी. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार. चेन्नईच्या समर्थकांना कदाचित असे वाटते की, त्यांच्या संघातील खेळाडू बाद व्हावेत आणि धोनीने फलंदाजीला यावे. याचे कारण म्हणजे धोनीला पाहता यावे. त्याला मैदानात हातात बॅट घेऊन उतरलेले पाहण्याची क्रेझ वेगळीच आहे. अशी मनोकामना केवळ चेन्नईची नाही, तर संपूर्ण देशातील त्याच्या चाहत्यांची आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये धोनीची टीम जिथे जाईल तिथे मैदान पिवळ्या रंगात रंगलेले दिसते. फार कमी क्रिकेटपटूंना असा पाठिंबा मिळाला आहे. (MS Dhoni Retirement)

मात्र, धोनी आता आयपीएल करिअरच्या शेवटच्या टप्प्यावर आहे. तो स्वत: याबाबत रोज बोलत राहतो. असाच काहीसा प्रकार आयपीएलच्या 45 व्या सामन्यातही पाहायला मिळाला. टॉसनंतर समालोचक डॅनी मॉरिसन याने धोनीला त्याच्या निवृत्तीवरून प्रश्न विचारल. या प्रश्नासाठी धोनी तयार होता. त्याने हसतहसत उत्तर दिले. तो म्हणाला, ‘हा माझा शेवटचा आयपीएल हंगाम आहे असे तुम्हीच ठरवले आहे.’ (MS Dhoni Retirement)

यानंतर मॉरिसन हसला आणि म्हणाला, ‘याचा अर्थ तू खेळत राहणार आहेस.’ स्टेडियममधील प्रेक्षकांकडे पाहत तो पुढे म्हणतो की, ‘धोनी पुढच्या वर्षीही मैदानात उतरेल. धोनीला खेळताना पाहून आनंद मिळतो.’ (MS Dhoni Retirement)

निवृत्तीबाबतचा प्रश्न हा 2020 पासून धोनीच्या कारकिर्दीवर घिरट्या घालत आहे. 2022 मध्ये धोनीने चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर शेवटचा सामना खेळणार असल्याचे संकेत दिले होते. त्यातच यंदाचा आयपीएल हंगाम पुन्हा होम-अवे फॉरमॅटमध्ये खेळला जात आहे, त्यामुळे चाहते त्याच्या निवृत्तीबद्दल अंदाज लावत आहेत. मात्र, आतापर्यंत धोनीने निवृत्तीबाबत काहीही स्पष्ट केलेले नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by IPL (@iplt20)

Back to top button