MI vs PBKS : सूर्यकुमार-इशानची शतकी भागिदारी; मुंबईचा पंजाबवर ६ विकेट्सने विजय | पुढारी

MI vs PBKS : सूर्यकुमार-इशानची शतकी भागिदारी; मुंबईचा पंजाबवर ६ विकेट्सने विजय

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुढारी ऑनलाईन डेस्क : सूर्यकुमार यादव आणि इशान किशनची शतकी भागिदारी आणि पियुष चावलाच्या फिरकीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जवर ६ विकेट्सने विजय मिळवला. हा सामना मोहालीच्या पंजाब क्रिकेट असोशिएशन या मैदानावर खेळवण्यात आला होता. मुंबईने सलग दुसऱ्यांदा २०० पेक्षा जास्त धावांच्या आव्हानाचा यशस्वीरित्या पाठलाग केला आहे. सूर्यकुमार यादव आणि इशान किशन या जोडीने शतकी भागिदारी करत पंजाबच्य गोलंदाजांची धु धु धुलाई केली. पंजाब किंग्जचा गोलंदाज अर्शदीप सिंगची मुंबईच्या फलंदाजांनी अक्षरश: पिसं काढली. त्याच्या ३.५ षटकांमध्ये ६६ धावा काढल्या.

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीची करण्याचा निर्णय़ घेतला होता. यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्ससमोर २१५ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. पंजाब किंग्जच्या २१५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबईने हे लक्ष्य १८.५ षटकांमध्ये पूर्ण केले. मुंबईकडून इशान किशन ४१ चेंडूमध्ये ७५, कॅमरन ग्रीन १८ चेंडूमध्ये २३, सूर्यकुमार यादव ३१ चेंडूमध्ये ६६ धावा आणि तिलक वर्माने १० चेंडूमध्ये नाबाद २६ धावांचे योगदान दिले. पंजाब किंग्जकडून नेथन इलीसने २ तर रिषी धवन आणि अर्शदीप सिंगने प्रत्येकी १ विकेट पटकावली. .

तत्पूर्वी, पंजाब किंग्जकडून लिवम लिविंगस्टोनने आक्रमक फलंदाजी केली. त्याने मुंबईच्या गोलंदाजांची धु धु धुलाई केली. अनुभवी जोफ्रा आर्चरच्या एका षटकात त्याने सलग ३ षटकार लगावले. लिविंगस्टोनने ४२ चेंडूमध्ये ८२ धावांची खेळी केली. याशिवाय जितेश शर्माने २७ चेंडूमध्ये ४९ धावा, शिखर धवन २० चेंडूमध्ये ३० धावा, मॅथ्यू शॉर्टने २६ चेंडूमध्ये २७ धावांचे योगदान दिले. मुंबईकडून पियुष चावलाने २ तर अर्शद खानने १ विकेट पटकावली. .

Back to top button