एकनाथ खडसेंना मोठा धक्का ; भुसावळ बाजार समितीवर फुलले कमळ | पुढारी

एकनाथ खडसेंना मोठा धक्का ; भुसावळ बाजार समितीवर फुलले कमळ

जळगाव : भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर झाला आहे. यात भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातून सत्ता आपळल्याकडे ओढून घेतली. भाजप पुरस्कृत शेतकरी विकास पॅनल विरूध्द महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी सहकार पॅनलमध्ये तगडी लढत झाली. यात आमदार संजय सावकारे यांनी भाजपच्या पॅनलचे तर आमदार एकनाथ खडसे व माजी आमदार संतोष चौधरी यांनी मविआच्या पॅनलचे नेतृत्व केले.

भुसावळ बाजार समितीत याआधी माजी आमदार संतोष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. या निवडणुकीत तर आमदार एकनाथ खडसे आणि माजी आमदार संतोष चौधरी यांनी दोघांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली होती. मात्र भाजप आमदार संजय सावकारे यांनी या दोन्ही नेत्यांना कडवी झुंज दिली. या निवडणुकीत भाजप पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलने १८ पैकी १५ जागांवर विजय मिळवत बाजार समितीवर एक हाती सत्ता मिळवली. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या शेतकरी सहकार पॅनलला केवळ तीन जागांवर यश मिळालं आहे. हा निकाल महाविकास आघाडीचे नेते एकनाथ खडसे व माजी आमदार संतोष चौधरी यांना मोठा धक्का मानला जात आहे.

हेही वाचा : 

Back to top button