पुण्यात पर्यावरणप्रेमींकडून आज चिपको अंदोलन; नदी सुधार प्रकल्पातील झाडे तोडण्यास विरोध | पुढारी

पुण्यात पर्यावरणप्रेमींकडून आज चिपको अंदोलन; नदी सुधार प्रकल्पातील झाडे तोडण्यास विरोध

पुणे : पुण्यातील पर्यावरणप्रेमी आज चिपको आंदोलन करणार आहेत. मुळा मुठा नदी सुधार प्रकल्पातील जी झाडे तोडण्यात येणार आहेत त्या विरोधात पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर सायंकाळी ५ वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे. सुंदरलाल बहुगुणा यांनी केलेल्या चिपको आंदोलनाची पुनरावृत्ती या आंदोलनदरम्यान करण्यात येणार असल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे. सायंकाळी जंगली महाराज रस्त्यावरील सर्व आंदोलनकर्ते झाडांना मिठी मारणार आहेत. मुळा मुठा नदी सुधार प्रकल्पातील झाडे वाचवण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

Back to top button