वाकड येथील स्पा सेंटरवर छापा | पुढारी

वाकड येथील स्पा सेंटरवर छापा

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : स्पा सेंटरमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा वाकड पोलिसांनी पर्दाफाश केला. एका महिलेला पोलिसांनी अटक केली असून यामध्ये चार पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे. गुरुवारी (दि. 20) सायंकाळी साडेचारच्या सुमारास ओंकार कॉलनी येथील कनक स्पा सेंटर येथे ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी एका महिलेला (31, रा. वाकड) यास अटक केली आहे. तिच्यासह स्पा सेंटरची मालक (नाव व पत्ता माहिती नाही) या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिला पोलीस अंमलदार यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्त मंदिर रोडवरील ओंकार कॉलनीमध्ये कनक स्पा सेंटर आहे.

आरोपी महिला तरुणींना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करवून घेत होती. याबाबत वाकड पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. पिडीत महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत त्यातून मिळालेल्या पैशांवर आरोपी महिलेने तिची उपजीविका भागवली असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशन.

Back to top button