काँग्रेसच्या याचिकांमुळे निवडणुका लांबणीवर ; प्रदेशाध्यक्ष बावनकुळे | पुढारी

काँग्रेसच्या याचिकांमुळे निवडणुका लांबणीवर ; प्रदेशाध्यक्ष बावनकुळे

शिर्डी : पुढारी वृत्तसेवा : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या भाजप नेत्यांमुळे नव्हे, तर काँग्रेसने न्यायालयात केेलेल्या याचिकांमुळे लांबणीवर पडल्या आहेत. असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिर्डीत केले. शासकीय विश्रामगृहावर कार्यकर्त्यांची व भाजपा पदाधिकार्‍यांच्या बैठकी दरम्यान बोलत होते. याप्रसंगी चंद्रशेखर बावनकुळे व इतर नेत्यांनी भाजप पक्षाचा संघटनात्मक आढावा घेऊन मार्गदर्शन केले. यावेळी खा. सुजय विखे, माजी आ. स्नेहलता कोल्हे, माजी आ.चंद्रशेखर कदम, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाला जिल्ह्यातील भाजप नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका मंत्री, नेत्यांमुळे थांबल्या नाहीत तर सुप्रीम कोर्टाकडे यासंदर्भात तीन याचिका दाखल आहेत व त्याही सरकार किंवा भाजपने नाही, तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दाखल केल्या आहेत. ओबीसी संदर्भात तसेच परस्पर जागा वाढवल्यासंदर्भात आणि लोकसंख्येची वाढ न बघता जागा वाढवल्या या संदर्भात या याचिका दाखल आहेत. उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. निकाल लागला तर दीड महिन्यात या निवडणुका होऊ शकतील, असा अंदाज व्यक्त करत

वरिष्ठ ठरवतील, तोच मुख्यमंत्री
राजकारणात, समाजकारणात, जर- तर याला काही अर्थ नाही. देवेंद्र फडणवीस व भाजपा वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील. तो भावी मुख्यमंत्री होईल. एकनाथ शिंदे यांनी कधीच मुख्यमंत्री करा, म्हणून म्हटले नव्हते. त्यांनाही वाटलं नव्हतं. पण राजकारणात काहीही घडतं. त्यामुळे आगामी मुख्यमंत्री कोण? त्याची वाट बघू? असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भावी मुख्यमंत्री कोण? यावर बोलताना स्पष्ट केले.

Back to top button