नागपूर : विद्यापीठ परीक्षांचे निकाल वेळेवर घोषित करा : आपची मागणी | पुढारी

नागपूर : विद्यापीठ परीक्षांचे निकाल वेळेवर घोषित करा : आपची मागणी

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या हिवाळी आणि उन्हाळी परीक्षा वेळेत घेण्यात याव्यात. तसेच निकालही मुदतीत घोषित करण्यात यावेत, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या छात्र युवा संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात आज (दि.६) आम आदमी पार्टी छात्र युवा संघर्ष समितीद्वारे प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांना निवेदन देण्यात आले.

सीवायएसएस प्रभारी सचिन वाघाडे यांच्या नेतृत्वात विद्यापीठ संदर्भात आठ महत्वाच्या मुद्द्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली. प्र-कुलगुरू यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर दुधे यांनी येणाऱ्या १५ दिवसात मांडलेल्या प्रत्येक समस्येचे निवारण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी आप युवा आघाडीच्या नागपूर शहराचे अध्यक्ष श्याम बोकडे, शहर उपाध्यक्ष दीपक भातखोरे, शहर सह सचिव स्वप्नील सोमकुवर, उत्तर नागपूर युवा अध्यक्ष पंकज मेश्राम, उत्तर नागपूर युवा उपाध्यक्ष शुभम मोरे, विनित गजभिये उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button