धारावी : शिव टेकडीवरील मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्साहात | पुढारी

धारावी : शिव टेकडीवरील मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्साहात

धारावी; पुढारी वृत्तसेवा : शिव कोळीवाडा हनुमान टेकडीवरील श्रीसमर्थ हनुमान मंदिरात पारंपरिक पद्धतीने हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.

एक जागृत देवस्थान असल्याने जन्मोत्सवानिमित्त मारूतीचे दर्शन घेण्यासाठी मंदिर परिसरात भाविकांनी गर्दी केली होती. सकाळी सहाच्या दरम्यान पाळणा फुलांनी सजवून महिलांनी विधीपूर्वक हनुमान जन्मोत्सव सोहळा पार पाडला. जन्म सोहळ्याला परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. त्यानंतर मारुतीचे दर्शन घेत भाविकांनी सुंठवडा, बुंदीचा लाभ घेतला. अंजनीपुत्र हनुमान की जय…, पवनपुत्र हनुमान की जय , अशा जयघोषाने यावेळी मंदिर परिसर दुमदुमून गेला.

सामूहिक सुंदरकांडाच्या पठणानंतर श्रीराम राज्याभिषेक कथा समापनाला सुरुवात करण्यात आली. शारदा शक्तीपीठ मैहर येथून आलेल्या महामंडलेश्वर साध्वी माता अन्नपूर्णा यांनी कथेतून यावेळी लोकांचे प्रबोधन केले. मंदिरपरिसरात भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गेले नऊ दिवस सुरू असलेल्या उत्सवाची उत्सवाची सांगता पालखी मिरवणूक, पूर्णाहुती यज्ञ आणि महाप्रसादाने करण्यात आली.

हेही वाचलंत का ? 

 

 

 

Back to top button