मोठा अनर्थ टळला! जुन्नरच्या पारुंडेतील यात्रेत गाडीबगाडाचे’ शेले ‘तुटल्याने शेलेकरी जखमी | पुढारी

मोठा अनर्थ टळला! जुन्नरच्या पारुंडेतील यात्रेत गाडीबगाडाचे' शेले 'तुटल्याने शेलेकरी जखमी

जुन्नर, पुढारी वृत्तसेवा: श्री क्षेत्र पारुंडे येथील ब्रम्हनाथाच्या दर्शनाला काटेडे येथील नवसाचे गाडी बगाड दर्शनाला नेण्याची परंपरा आहे. हे गाडी बगाड दर्शनाला आणले जाते होते. त्यावेळी ते फिरवीत असताना गाडीबगाडाचे जुने झालेले लाकडी शेले तुटून बगाडाला लटकलेले दोन जण उंचावरून खाली पडले. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मुंबईत रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गाडीबगाडाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी असते. परंतु, सुदैवाने दुर्घटना टळली. काटेडे येथील चिलप कुटुंबियांची मानाचे व नवसाचे गडीबगाड नेण्याची प्रथा आहे. गाडीबगाडावरील शेले फिरवीत असताना बगाडाचे जुने झालेले शेले तुटले. परिणामी शेलेकरी खाली जमलेल्या भक्तगणांच्या अंगावर कोसळले. संदीप चिलप व सुनील चिलप हे शेलेकरी यात जखमी झाले. चिलप कुटुंबीय प्रतिवर्षी चैत्र चोदस तिथीच्या दिवशी गाडीबगाड नेण्याची परंपरा पाळत आहे. गाडीबगाडावर लाकडी शेल्याला चिलप कुटुंबातील दोन शेलेकरी लटकलेले असतात, तर गाडीबगाडावर पारंपरिक पोशाखात वीर उभे असतात.

Back to top button