Nashik : डिजेल चोरणारी टोळी लासलगाव पोलिसांनी केली जेरबंद
लासलगाव (जि. नााशिक) पुढारी वृत्तसेवा
ट्रकमधून डिजेलची चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला लासलगाव पोलीसांनी सिने स्टाईल पाठलाग करत जेरबंद केले आहे. या कारवाईत स्कोडा गाडीसह तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लासलगाव पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी दिली.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिस उपनिरीक्षक अजिनाथ कोठाळे, पोलिस नाईक संजय देशमुख, पोलिस कॉन्स्टेबल कैलास मानकर हे गस्त घालत होते. दरम्यान विंचुर परिसरात एक स्कोडा गाडी फिरत असल्याची माहिती त्यांना मिळाली. पोलिसांना संशय आल्याने या गाडीचा शोध घेवून सिनेस्टाईल पाठलाग करुन गाडी पकडली असता गाडीत डिजलचे ड्रम मिळून आले. गाडीतील अजय मिथुन शिंदे (20), शिवाजी सदाशिव मालखेडे ( 20), सदाशिव मालखेडे (19) या तिघांची विचारपूस केली असता त्यांनी विंचुर येथील भारत पेट्रोलंपप येथे डिजेल चोरी केली असल्याची कबुली दिली.
संशयितांना न्यायालयाने पोलिस कस्टडी सुनावली आहे. अधिक तपास सहा पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अजिनाथ कोठाळे, पोलिस नाईक योगेश शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल भगवान सोनवणे हे करत आहे.
हेही वाचा :
- सनी झाली ग्रीनी; चाहत्यांनी कमेंट बॉक्समध्ये लावली आग 🔥🔥
- अखेर राहुरी ग्रामीण भागास न्यायालयात न्याय : आ. प्राजक्त तनपुरे
- नाशिक : आजपासून सुरु होणाऱ्या भैरवनाथ महाराज यात्रोत्सवाची जय्यत तयारी