नाशिकमध्ये उन्हाचा तडाखा वाढला | पुढारी

नाशिकमध्ये उन्हाचा तडाखा वाढला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
येथे एप्रिलच्या प्रारंभीच उन्हाचा तडाखा वाढला आहे. वाढत्या उन्हासोबत सर्वसामान्यांना घामाच्या धारा लागल्या आहेत. शहरात शनिवारी (दि. 1) 32.4 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यातील ढगाळ हवामानानंतर नाशिकमधील वातावरणात पुन्हा एकदा मोठा बदल झाला आहे. उन्हाचा कडाका वाढला असून एप्रिलच्या पहिल्याच दिवशी पारा 32 अंशांपलीकडे पोहोचला आहे. त्यामुळे उन्हाच्या तीव्र झळा जाणवायला लागल्या आहेत. दुपारी 12 ते 4 या वेळेत सूर्याची प्रखरता अधिक असल्याने सुटीचा दिवस असूनही नागरिकांनी घरातच बसणे पसंत केले. तसेच उकाड्यापासून बचाव करण्यासाठी शीतपेयांची मदत घेतली जातेय. त्याचवेळी ग्रामीण भागातही उन्हाचा कडाका वाढला आहे. परिणामी ग्रामीण जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. सकाळपासूनच उन्हाचा चटका लागत असल्याने कामे थंडावली आहेत. दरम्यान, मध्य भारतामधील मैदानी प्रदेशात हवेतील आर्द्रता संपुष्टात आल्याने उन्हाचा जोर वाढला आहे.

हेही वाचा:

Back to top button