नगर : पिण्याचे पाणी, घनकचर्‍यासाठी 22 कोटी | पुढारी

नगर : पिण्याचे पाणी, घनकचर्‍यासाठी 22 कोटी

नगर : पुढारी वृत्तसेवा :  पिण्याचे पाणी (पावसाच्या पाण्याची साठवण व पुनर्वापरासह) व घनकचरा व्यवस्थापनासाठी जिल्ह्यातील महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती व कटक मंडळ (छावणी परिषद) यांना राज्य शासनाकडून 22 कोटी रूपयांचा निधी देण्यात आला आहे. सन 2021-2022 ते 2025-2026 या वर्षासाठी पंधरावा केंद्रीय वित्त आयोग गठीत झालेला आहे. या आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासनाकडून मुक्त करण्यात आलेला नॉन-मिलियन प्लस सिटीज गटातील राज्यातील ‘ड’ वर्ग महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती व कटक मंडळ (छावणी परिषद) या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी लोकसंख्या व क्षेत्रफळ या निकषांच्या आधारे सन 2022-2023 या वर्षात बंधनकारक (टाईड) अंतर्गत 286.50 कोटी रूपये, तर अबंधनकारक (अनटाईड)/मूलभूत (बेसिक) अंतर्गत 191 कोटी रूपये निधी शासनाकडून वितरित करण्यात आला आहे.

त्यामध्ये नगर जिल्ह्याला बंधनकारक अनुदानाच्या पहिल्या हप्त्यापोटी 13 कोटी 23 लाख 49 हजार 781 रूपये, तर अबंधनकारक/मूलभूत अनुदानाच्या पहिल्या हप्त्यापोटी 8 कोटी 77 लाख 65 हजार 517 रूपये, असा एकूण 22 कोटी, 1 लाख 15 हजार 298 रूपये निधी देण्यात आला आहे. बंधनकारक व अबंधनकारक असा मिळून नगर महापालिकेला 7 कोटी 22 लाख 51 हजार 900 रूपयांचा निधी मिळणार आहे.

नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या आयुक्तांकडे सदर निधी सुपूर्द करण्यात आला असून, त्यांनी तो संबंधित नागरी स्वराज्य संस्थांना वितरित करण्याच्या सूचना नगरविकास विभागाकडून देण्यात आल्या आहेत. सदर अनुदान ‘सशर्त’ म्हणून वितरित करण्यात आले आहे. शासनाने निर्गमित केलेल्या आदेशातील तरतुदी व वेळोवेळी दिलेल्या सूचनांनुसार सदर अनुदानातून खर्च करणे या स्थानिक स्वराज्य संस्थांना बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळालेला बंधनकारक निधी. कंसात अबंधनकारक निधी – नगर महापालिका 4,34,62,319 (2,87,89,581), श्रीरामपूर नगरपरिषद 1,08,64,485 (71,96,487), संगमनेर नगरपरिषद 83,36,539 (55,21,953), कोपरगाव नगरपरिषद 80,76,778 (53,49,885), राहुरी नगरपरिषद 60,32,393 (39,95,666), राहता नगरपरिषद 34,00,764 (22,52,452), श्रीगोंदा नगरपरिषद 65,95,322 (43,68,556), देवळाली-प्रवरा न. प. 51,52,372 (34,12,733), पाथर्डी नगरपरिषद 43,61,426 (28,88,803), नेवासा नगरपरिषद 38,78,855 (25,69,144), शिर्डी नगरपंचायत 46,99,053 (31,12,450), जामखेड नगरपरिषद 69,08,899 (45,76,272), अकोले नगरपंचायत 28,05,670 (18,58,257), कर्जत नगरपंचायत 38,73,764 (25,65,771), पारनेर नगरपंचायत 34,28,827 (22,71,041), शेवगाव नगरपरिषद 65,96,680 (43,69,455), नगर छावणी परिषद 38,75,635 (25,67,011

Back to top button