१५ हजार ९२० कोटी रुपयांची मिलिट्री हार्डवेअरची विक्रमी निर्यात : संरक्षण मंत्री राजनाथ सिंग
नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये विक्रमी 15 हजार 920 कोटी रुपयांची मिलिट्री हार्डवेअरची निर्यात झाली असल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी शनिवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. वर्ष 2021-22 मध्ये हीच निर्यात 12 हजार 814 कोटी रुपयांची होती.
मिलिट्री हार्डवेअरच्या निर्यातीत सातत्यपूर्ण वाढ होत असून वर्ष 2022-23 मध्ये निर्यातीचा विक्रमी आकडा गाठला गेला आहे, असे सिंग यांन नमूद केले. याआधी वर्ष 2016-17 मध्ये 1 हजार 521 कोटी रुपये, 2017-18 मध्ये 4 हजार 682 कोटी रुपये, वर्ष 2018-19 मध्ये 10 हजार 745 कोटी रुपये, 2019-20 मध्ये 9 हजार 115 कोटी रुपये तर वर्ष 2020-21 मध्ये 8 हजार 434 कोटी रुपयांच्या मिलिट्री हार्डवेअरची निर्यात झाली होती, असेही सिंग यांनी सांगितले.
India’s defence exports have reached an all-time high of Rs 15, 920 crore in FY 2022-2023. It is a remarkable achievement for the country.
Under the inspiring leadership of PM Shri @narendramodi, our defence exports will continue to grow exponentially. pic.twitter.com/rav4En4lAH
— Rajnath Singh (@rajnathsingh) April 1, 2023
Excellent! A clear manifestation of India’s talent and the enthusiasm towards ‘Make in India.’ It also shows the reforms in this sector over the last few years are delivering good results. Our Government will keep supporting efforts to make India a defence production hub. https://t.co/AL3sLknFOL
— Narendra Modi (@narendramodi) April 1, 2023
हेही वाचा :
- लॉरेन्स बिष्णोई टोळीचे पुणे कनेक्शन? खा. संजय राऊत धमकी प्रकरणात एकजण ताब्यात
- Maharashtra Temperature : एप्रिलमध्ये पारा वाढणार; पण लाट नाही, महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 53 टक्के अधिक
- Indigo Flight : विमानातील गैरप्रकार थांबेना; प्रवाशाकडून केबिन क्रूचा ‘विनयभंग’; स्वीडिश नागरिकाला अटक