Maharashtra Temperature : एप्रिलमध्ये पारा वाढणार; पण लाट नाही, महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 53 टक्के अधिक

file photo
file photo

पुणे; पुढारी वृत्तसेवा : एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात देशाच्या बहुतांश भागांत तापमानाचा पारा 3 ते 4 अंशांनी वाढून 35 ते 38 अंशांपर्यंत जाईल. मात्र, कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा कमीच राहणार आहे, तर एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यात हीच स्थिती राहील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. यंदा मार्चमध्ये प्रथमच देशातील तब्बल 22 राज्यांत अतिवृष्टी, तर दोन राज्यांत मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. देशात कुठेही उष्णतेची लाट नव्हती. ( Maharashtra Temperature )

कमाल तापमानात सतत 4 ते 5 अंशांनी घट होती. असा प्रकार मार्च महिन्यात प्रथमच घडला. सर्वाधिक पाऊस हा गुजरात व कच्छमध्ये झाला असून, तेथे सर्व 33 जिल्ह्यांत अतिवृष्टीची नोंद झाली. महाराष्ट्रात मार्चमधील सरासरीपेक्षा 53 टक्के अधिक पाऊस बरसला. मार्चमध्ये मध्य भारतात सरासरी पाऊस 33 ते 36 मि.मी. इतका होतो, तर देशात सरासरी 26 ते 29 मि.मी. इतका होतो.

मात्र, यंदा मार्चमध्ये ऊन कमी अन् पाऊसच जास्त होता. देशातील 36 राज्यांपैकी 22 राज्यांत अतिवृष्टी, तर 2 राज्यांत मुसळधार, 5 राज्यांत साधारण, 4 राज्यांत कमी पाऊस झाला. 3 राज्यांत कमी पडला. पण, पाऊस पडला नाही असे एकही राज्य नाही. मार्च महिन्यात सरासरी कमाल तापमान कुठेही 40 अंशांवर गेले नाही. उलट त्यात सतत 3 ते 4 अंशांनी उतार होताना दिसला. त्यामुळे यंदाचा मार्च हा सर्वांत थंड ठरला.

 Maharashtra Temperature : अतिवृष्टी राज्ये…
गुजरात : 33 पैकी 33 जिल्हे
मध्य प्रदेश : 52 पैकी 44 जिल्हे
उत्तर प्रदेश : 75 पैकी 43 जिल्हे
बिहार : 38 पैकी 29 जिल्हे
महाराष्ट्र : 36 पैकी 17 जिल्हे
आसाम : 27 पैकी 15 जिल्हे
मेघालय : 11 पैकी 7 जिल्हे
पं. बंगाल : 19 पैकी 14 जिल्हे
हरियाणा : 11 पैकी 14 जिल्हे
दिल्ली : 9 पैकी 8 विभाग

महाराष्ट्रातील पावसाची स्थिती
मुंबईसह कोकण विभाग :
53 टक्के अधिक
मध्य महाराष्ट्र : 80 टक्के अधिक
मराठवाडा : उणे 9 टक्के (साधारण)
विदर्भ ः 52 टक्के अधिक
देशात कुठे किती टक्के
(देशात एकूण 26 टक्के अधिक)
पूर्वोत्तर भारत : 18 टक्के अधिक
उत्तर पश्चिम भाग : उणे 18 टक्के
मध्य भारत : 202 टक्के
दक्षिण भारत : 113 टक्के

  • मध्य महाराष्ट्रात 80 टक्के
  • सर्वांत कमी मराठवाड्यात उणे 9 टक्के
  • तापमानात महिनाभर होती घट
  • एकही उष्णतेची लाट नाही
  • असे प्रथमच घडले

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news