Indigo Flight : विमानातील गैरप्रकार थांबेना; प्रवाशाकडून केबिन क्रूचा ‘विनयभंग’; स्वीडिश नागरिकाला अटक

indigo flight
indigo flight
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : Indigo Flight : विमानात प्रवाशांकडून केल्या जाणाऱ्या गैरवर्तनाचे प्रकार थांबणे तर लांबच मात्र अशा प्रकारांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. इंडिगो फ्लाइटमध्ये मद्यधूंद अवस्थेत एका स्वीडिश प्रवाशाने थेट केबिन क्रूची छेड काढली. विमान प्रवाशांकडून केल्या जाणाऱ्या गैरवर्तनाची ही अगदीच ताजी घटना आहे. दरम्यान, या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी 20 हजार रुपयांच्या जामीनावर त्याला सुटका करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, बँकॉकहून मुंबईला येणाऱ्या इंडिगो फ्लाइट (6E-1052) Indigo Flight मधील ही घटना आहे. चार तासांच्या प्रवासात ही घटना घडली. क्लास एरिक हॅराल्ड वेस्टबर्ग (वय 63), असे या आरोपी प्रवाशाचे नाव आहे.

केबिन क्रूने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, जेवण दिले जात असताना प्रवाशाने गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. आणि Indigo Flight विमानाने लँडिंग करेपर्यंत त्याचे हे गैरवर्तन सुरूच राहिले. 28 E सीटवर बसलेल्या प्रवाशाने मद्यधुंद अवस्थेत त्याला जेवण देत असताना 24 वर्षीय केबिन क्रू सदस्येला चूकीच्या प्रकारे स्पर्श केला.

Indigo Flight : केबिन क्रू च्या महिला सदस्याने सांगितले, जेवण दिल्यानंतर मी पीओएस मशीनद्वारे पैसे भरण्यासाठी, कार्ड स्वाइप करण्याच्या बहाण्याने प्रवाशाने माझा हात धरला. मी माझा हात मागे खेचला आणि त्याला कार्डचा पिन टाकण्यास सांगितले. यावेळी त्याने मर्यादा ओलांडली……आणि उठून इतर प्रवाशांसमोर माझा विनयभंग केला. मी जेव्हा जोरात ओरडले तेव्हा तो त्याच्या जागेवर परत गेला.
त्यानंतर वेस्टबर्ग हा पुन्हा उभा राहिला आणि दुसऱ्या एका केबिन क्रू सदस्याशी Indigo Flight वाद घालू लागला. शिवीगाळ करू लागला. हा आरोपी संपूर्ण प्रवासादरम्यान अश्लील शब्द म्हणत राहिला. त्यानंतर पीडितेने लाल चेतावणी कार्ड वाचून दाखवले आणि त्याला बेकायदेशीर प्रवासी म्हणून घोषित केले. वेस्टबर्गने आपल्या सहप्रवाशांवरही हल्ला केला. जो त्याच्या शेजारी 28 D वर बसला होता.

Indigo Flight : फ्लाइट लँड झाल्यावर इंडिगो सुरक्षा अधिकारी आणि सीआयएसएफ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आणि वेस्टबर्गला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

वेस्टबर्गचे वकील प्रभाकर त्रिपाठी म्हणाले की, आरोपीला आरोग्याच्या समस्या आहेत आणि त्याचे शरीर थरथरते. "तो मदतीशिवाय काहीही धरू शकत नाही. जेव्हा त्याने केबिन क्रूला स्पर्श केला तेव्हा त्याने POS पेमेंट कार्ड मशीनला धरण्याचा प्रयत्न केला. त्याने तिला जाणूनबुजून स्पर्श केला नाही."

वेस्टबर्ग हा गेल्या तीन महिन्यात अटक केलेला आठवा अनियंत्रित फ्लायर आहे. 2022 मध्ये पोलिसांनी सहा जणांना अटक केली. 2017 ते 2023 या कालावधीत विमानातील विनयभंगाची ही पाचवी घटना आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news