कोल्‍हापूर : तरस सदृश प्राण्याच्या हल्ल्यात ११ कोकरांचा मृत्यू; ४ जखमी | पुढारी

कोल्‍हापूर : तरस सदृश प्राण्याच्या हल्ल्यात ११ कोकरांचा मृत्यू; ४ जखमी

दानोळी; पुढारी वृत्तसेवा कवठेसार (ता. शिरोळ) येथील रत्नांची पट्टी या परिसरात बुधवारी रात्री तरस सदृश प्राण्याने हल्ला केला. यात 11 कोकरांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती वनविभागाला देऊन पंचनामा करण्यात आला.

हिंगणगाव (ता. हातकणंगले) येथील मेंढपाळ बिरू मेटकर व भागोजी मेटकर यांची मेंढरं खतासाठी कवठेसार येथील प्रकाश पाटील यांच्या (गट नं. ८८४) रत्नाची पट्टी नावाच्या शेतात आठ दिवसांपासून बसायला आहेत. बुधवारी रात्री तरससदृस्य प्राण्यांनी हल्ला करून जाळीत ठेवलेल्या ११ कोकरांना ठार केले. तर चार पिल्लांना गंभीर जखमी केले. यावेळी मेंढपाळ जागे झाल्यामुळे मोठा अनर्थ टाळला. या हल्ल्यात मेंढपाळांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. हल्ल्याची माहिती यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांना कळवली. वाघमोडे यांनी वनरक्षक अर्जुन खामकर, वनरक्षक देसाई व पशुवैद्यकीय अधिकारी यांना याची माहिती दिली. गुरुवारी सकाळी घटनास्थळी परिमंडळ वन अधिकारी आर के देसा, वनरक्षक मोहन देसाई यांनी भेट देऊन पंचनामा केला. डॉ.देशमुख यांनी शवविच्छेदन केले.

यावेळी सरपंच पोपट भोकरे, यशवंत क्रांती संघटनेचे अध्यक्ष संजय वाघमोडे, हातकणंगले तालुकाध्यक्ष यशवंत वाकसे, शिरोळ तालकाध्यक्ष दादासो गावडे, कुंभोज अध्यक्ष सुकुमार उर्फ पप्पू गावडे, विकी बन्ने, प्रकाश पाटील, वैभव पाटील, धोंडीराम मेटकर, मलकारी बंडगर, राजाराम धनगर, सर्जेराव गाढवे, आनंदा धनगर, सचिन धनगर, भैरू मेटकर, आकाराम अनुसे आदी उपस्थित होते. मृत कोकरांना शेतात दफन करण्यात आले आहे.

हेही वाचा : 

Back to top button