Gold Prices Today : दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीची संधी! | पुढारी

Gold Prices Today : दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीची संधी!

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

Gold Prices Today : नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (दि. ८) सोन्याच्या दरात किचिंत बदल झाला. सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅम भाव ४६,९४१ रुपये होता. गुरुवारी सोन्याचा दर ४६,९१८ रुपये होता. त्यात आज शुक्रवारी किचिंत तेजी दिसून आली. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा भाव ४६ हजारांवर स्थिरावला आहे.

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, Gold Prices Today शुक्रवारी ८ ऑक्टोबर रोजी २४ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम) ४६,९४१ रुपये, २३ कॅरेट सोने ४६,७५३ रुपये, २२ कॅरेट सोने ४२,९९८ रुपये, १८ कॅरेट ३५,२०६ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर २७,४६० रुपये होता. तर चांदीचा प्रति किलो दर ६०,९३२ रुपये होता. (हे शुक्रवार दुपारपर्यंतचे अपडेटेड दर असून सायंकाळपर्यंत त्यात बदल होऊ शकतो)

दरम्यान, डॉलर मजबूत झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे. एमसीएक्सवर सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४६,८४५ रुपये आहे. तर चांदीचा दर प्रति किलो ६१,०४० रुपये आहे. गेल्या वर्षी २०२० मध्ये सोन्याचा प्रति १० ग्रॅम दर ५६,१९१ रुपयांवर पोहोचला होता. तर सप्टेंबर २०२१ मध्ये सोने ४६ रुपयांपर्यंत खाली आले. सध्याचा दर हा गेल्या वर्षीच्या तुलनेत २० टक्क्यांनी कमी आहे.

शुद्ध सोने कसे ओळखाल?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : नवरात्रीची मंगलमय सुरुवात करूया महिषासुरमर्दिनी स्तोत्राने | Navratri 2021 |

Back to top button