६५३ काडतुसे हरवली आणि हुकुमशहा किम जोंग यांची सटकली…संपूर्ण शहरात लॉकडाउन! | पुढारी

६५३ काडतुसे हरवली आणि हुकुमशहा किम जोंग यांची सटकली...संपूर्ण शहरात लॉकडाउन!

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : उत्तर कोरियामधून एक धक्‍कादायक वृत्त समोर आले आहे. सैनिकांकडून ६५३ काडतुसे हरवल्‍या यानंतर हुकुमशहा किंम जोंग (Kim Jong Un) यांनी एक अजब फर्मान काढले आहे. सैनिकांकडून हरवलेल्‍या सर्व गोळ्या जप्‍त केल्‍या जात नाहीत तोपर्यंत हेसन शहरात लॉकडाउन आदेश जारी केला आहे. स्‍थानिक पोलिस आणि उत्तर कोरिया सैन्‍यदल मागील १० दिवसांपासून हरवलेल्‍या काडतुसांचा शोध घेत आहे. मात्र याचा अद्‍याप शोध लागलेल्‍या नाही. हुकुमशहा किम जोंग उन यांच्‍या निर्णयामुळे सर्वसामान्‍य जनतेची फरफट होत आहे.

‘रेडिओ फ्री अशिया’च्‍या रिपोर्टनुसार, उत्तर कोरिया सैन्‍यदलातील एक बटालियन २०२० मध्‍ये कोरोना काळात चीन सीमेवर तैनात करण्‍यात आली होती. कोरोनाचे संकट कमी झाल्‍यानंतर २५ फेब्रुवारी ते १० मार्च या कालावधीत बटालियची तुकडी परत आली. ७ मार्च २०२३ रोजी  हायसन शहरात काडतुसे हरविल्‍याचा प्रकार उघड झाला. जवानांनी सर्वप्रथम काडतुसे शोधण्‍याचा प्रयत्‍न केला.   मात्र त्‍यांना यश आले नाही. त्‍यांनी लष्‍करातील वरिष्‍ठ अधिकार्‍यांना याची माहिती दिली. यानंतर किम जोंग उन ( Kim Jong Un ) यांच्‍या आदेशानुसार संपूर्ण शहरात लॉकडाउन लागू करण्‍यात आले आहे. जोपर्यंत काडतुसे सापडत नाहीत तोपर्यंत हेसन शहरातील लॉकडाउनचा आदेश कायम राहील, असेही त्‍यांनी जाहीर केले आहे.

 Kim Jong Un : दोन लाख लोक नजरकैदेत, शहरातील सर्व घरांची झडती

रियांग शहराची लोकसंख्‍या सुमारे दोन लाख इतकी आहे. किम जोंग यांच्‍या लॉकडाउनच्‍या निर्णयामुळे संपूर्ण शहरातील नागरिक हे आपल्‍याच घरात नजरकैदेत राहत आहेत. स्‍थानिक पोलीस व सैन्‍यदलाचे जवान शहरातील सर्व घरांची झडती घेत आहेत. हरवलेली काडतुसे मिळत नाहीत तोपर्यंत हा शोध सुरुच राहिल, असे आदेश असल्‍याचे पोलिसांनी स्‍पष्‍ट केले आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button