पुणे : शास्त्रीय नृत्यकलेला प्रोत्साहन देणे ही समाजाची जबाबदारी : चंद्रकांत पाटील | पुढारी

पुणे : शास्त्रीय नृत्यकलेला प्रोत्साहन देणे ही समाजाची जबाबदारी : चंद्रकांत पाटील

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शास्त्रीय नृत्यकला आणि लोककलेला प्रोत्साहन देणे ही समाजाची जबाबदारी आहे. त्यामुळे संगीत आणि नृत्य कलेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि कलेचा हा ठेवा जपण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करु, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. कोथरुडमध्ये नृत्य संकुल उभारण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

पालकमंत्री पाटील यांच्या पुढाकाराने आणि शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था यांच्या माध्यमातून कोथरुड मध्ये नृत्यवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार, ज्येष्ठ पत्रकार विजय बाविस्कर, प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना शमा भाटे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

पाटील म्हणाले, हिंदू संस्कृतीत शास्त्रीय नृत्य कला आणि लोककलेच्या साधनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण यातूनच अनेकांना मानसिक समाधान मिळते. आपल्या संस्कृतीचे महत्त्व ओळखूनच आगामी काळात अनेक परदेशी नागरिक आपल्या संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे कळेल प्रोत्साहन देणे ही आपलं कर्तव्य आहे. ते म्हणाले की, कोथरुड हे संस्कृतीचे माहेरघर आहे. त्यामुळे इथे नृत्यकलेच्या संवर्धनासाठी नृत्यसंकुल उभारण्याची मागणी आहे. आयोजकांनी नृत्य संकुल ऊभारण्यासाठी जागेचा शोधा घ्यावा. पालकमंत्री नात्याने त्यासाठी सर्वतोपरी मदत करू.

Back to top button