भंडारा : टिप्परने चिरडले, आजोबा-नात ठार | पुढारी

भंडारा : टिप्परने चिरडले, आजोबा-नात ठार

भंडारा, पुढारी वृत्‍तसेवा : नागपूर नाका येथे भरधाव असलेल्या एका टिप्पर आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीवरील आजोबांचा आणि नातीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना आज शनिवारी दुपारच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, कवळू बडवाईक (वय ७०), वाणी महेंद्र बडवाईक (वय ५) दोघेही रा. नवीन पुनर्वसन पिंडकेपार (बेला) असे अपघातात ठार झालेल्या आजोबा आणि नातीचे नाव आहे. कवळू बडवाईक हे आयुध निर्माणीतून सेवानिवृत्त झाले होते.  त्यांची नात वाणी ही भंडारा येथील गायत्री विद्या मंदिरात शिक्षण घेत होती. तिला दररोज सकाळी शाळेत घेऊन जाणे व सुटीनंतर तिला परत आणणे असा त्‍यांचा नित्यक्रम होता.

दरम्‍यान, आज दुपारी शाळेची सुट्‌टी झाल्यानंतर ते वाणीला घेऊन दुचाकी क्र . एमएच ३६ टी ३७५३ ने गावाकडे जात असताना रस्ता बांधकामासाठी वापरण्यात येणा-या टिप्पर क्र . एमएच ४९/०७०१ ने भरधाव वेगात त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी टिप्परचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच याचा पुढील तपास पोलीस करत  आहेत.

 

Back to top button