सप्तरंगी बीड्स | पुढारी

सप्तरंगी बीड्स

बीडस्, विभिन्न प्रकारचे स्टोन जे सध्या फॅशन विश्वात आपला प्रभाव दाखवत आहे. यांचे सप्तरंगी रूप आणि वेगवेगळे आकार आपली उपस्थिती दर्शवते आहे. प्रत्येकाची पसंत बनलेली हे बीडस् मग ते ब्रेसलेट, इयररिंग असो वा नेकलेस या सर्वांमध्ये फीट बसतात. चिपचीप करणार्‍या या उन्हाळ्यात कोटेड आर्टिफिशियल ज्वेलरीचे चलन मागे पडत आहे. अशावेळी नवी फॅशन काय, तर जी सुंदर असेलच, शिवाय आरामदायकही स्वस्त इतकी फॅशनच्या बदलत्या ट्रेंडनुसार बदलताना महागात पडू नये, सहज उपलब्ध होईल.

रंगीबेरंगी असणारे हे बीडस् प्रत्येक ड्रेसवर मॅचही होतील. बीडस्वरील सर्व अटीची पूर्तता करतात. बीडस्चे आणखी एक वैशिष्ट म्हणजे इयरिंग बनविताना यांना मनपसंत आकारात घालू शकता. कलर मॅचिंग किंवा काँस्ट्रास्टसोबत यांच्या आकारातही व्हरायटी बघायला मिळते.

ब्रेसलेटमध्येही विविध रंग आरामात निवडता येईल. नाजूक मनगटावर कितीही मोठ्या आकाराच्या बीडस् आणि त्यांचे सर गुंडाळाल हे तुम्हीच ठरवू शकता. तुमचा ड्रेस खास बनविण्यासाठी गोल्डन आणि सिल्व्हर बीडस्चा वापर करू शकता. ड्रेसवर प्लास्टिक बीडस् वापर मात्र कमीत कमी करा. रंगाच्या उतार चढावाने सजलेला गळा प्रत्येकाचे मन मोहीत करते. बीडस् आकार वेगवेगळ्या प्रसंगानुसार आपले खास स्थान निर्माण करतो. गळ्यावर फीट असलेली बारीक बीडसची माळ तुम्हाला खास बनविते.
( फॅशन )

संबंधित बातम्या
Back to top button