एरिक गार्सेट्टी यांनी भारतातील अमेरिकेचे राजदूत म्हणून घेतली शपथ | पुढारी

एरिक गार्सेट्टी यांनी भारतातील अमेरिकेचे राजदूत म्हणून घेतली शपथ

पुढारी ऑनलाइन डेस्क : एरिक गार्सेट्टी यांनी आज भारतातील अमेरिकेचे राजदूत म्हणून शपथ घेतली. राजदूत गार्सेटी हे एक वचनबद्ध लोकसेवक आहेत आणि भारतातील लोकांसोबतची आमची भागीदारी मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील, अशी प्रतिक्रिया अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस यांनी दिली आहे.

अमेरिकेच्या संसदेच्या परराष्ट्र व्यवहार समितीने भारतातील राजदूतपदासाठी लॉस एंजेलिसचे माजी महापौर एरिक गार्सेटी यांच्या नावाला मंजुरी दिली होती. अध्यक्ष जो बिडेन यांनी एरिक गार्सेट्टी यांच्या नावाचा प्रस्ताव समितीकडे पाठवला होता. जानेवारी 2021 पासून भारतात अमेरिकेचा एकही राजदूत नव्हता, जवळपास दोन वर्षानंतर अमेरिकेने भारतात आपला स्थायी राजदूत नियुक्त केला आहे.
डेमोक्रॅटच्या सर्व सदस्यांनी एरिक गार्सेट्टी यांच्या बाजूने मतदान केले होते. भारतातील अमेरिकेच्या राजदूतासाठी एकूण 52 मते पडली, त्यापैकी एरिक गार्सेट्टी यांच्या बाजूने 42 मते पडली होती. सर्व डेमोक्रॅट्स तसेच रिपब्लिकन सिनेटर टॉड यंग आणि बिल हर्टी यांनीही एरिक गार्सेट्टी यांच्या बाजूने मतदान केले होते.

एरिक गार्सेटी हे अध्यक्ष जो बायडेन यांच्या निवडणूक प्रचाराचे सह-अध्यक्ष होते. ते जो बिडेन यांच्या जवळचे मानले जातात. एरिक यांचा बिडेन यांच्या मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो, असे मानले जात होते. परंतु जेकब्सचा वाद ज्या प्रकारे उलगडला, त्यामुळे ते शर्यतीतून बाहेर पडले. एरिकवर रिक जेकब्सवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता. जानेवारी 2021 पासून भारतात अमेरिकेचा एकही राजदूत नव्हते, जवळपास दोन वर्षानंतर अमेरिकेने भारतात आपला स्थायी राजदूत नियुक्त केले आहेत.

एरिक गार्सेटी यांची कारकीर्द…

2013 मध्ये त्यांनी पहिल्यांदा महापौरपदाची निवडणूक लढवली आणि ती जिंकली. 2017 मध्ये त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली आणि जिंकली. एरिक गार्सेटी एक उत्कृष्ट छायाचित्रकार, संगीतकार आणि पियानोवादक देखील आहे. गार्सेट्टी यांनी अमेरिकन नौदलातही काम केले आहे.

Back to top button