Amruta Fadnavis | अमृता फडणवीस फसवणूक प्रकरणी डिझायनर अनिक्षाला २१ मार्चपर्यंत कोठडी | पुढारी

Amruta Fadnavis | अमृता फडणवीस फसवणूक प्रकरणी डिझायनर अनिक्षाला २१ मार्चपर्यंत कोठडी

पुढारी ऑनलाईन : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची फसवणूक करुन धमकावल्याप्रकरणी संशयित डिझायनर अनिक्षा जयसिंघानी हिला २१ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. काल (दि. १६) मुंबई पोलिसांनी उल्हासनगरमध्ये छापे टाकत, याप्रकरणातील आरोपी अनिक्षा हिला ताब्यात घेतले होते. आज तिला विशेष न्यायालयात हजर केले असता, २१ मार्चपर्यंत कोठडी पोलिस कोठडी सुनावली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ‘लाच’ देण्याचा प्रयत्न करणे आणि फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात तिच्या वडिलांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मलबार हिल पोलिसांनी अनिक्षा आणि तिच्या वडिलांविरोधात कलम १२० आणि भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा १९८८ अंतर्गत कलम ८ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष न्यायालयात आज मुंबई पोलिसांनी जयसिंघानी यांची सात दिवसांची कोठडी मागितली होती, पण न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

दरम्यान कोठडीची मागणी करताना, पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात आरोपीवर खंडणीचे आरोप जोडले आहेत. तसेच आरोपीने तक्रारदाराला (अमृता) ब्लॅकमेल केले आणि तिला काही व्हिडिओ पाठवल्यानंतर 1 कोटी रुपयांची मागणी केली असल्याचा दावा देखील न्यायालयापुढे केला आहे.

हेही वाचा:

Back to top button