maharashtra politics | माझ्या कुटुंबियांना तपास यंत्रणेकडून नाहक त्रास, राजन साळवी यांना अश्रू अनावर | पुढारी

maharashtra politics | माझ्या कुटुंबियांना तपास यंत्रणेकडून नाहक त्रास, राजन साळवी यांना अश्रू अनावर

पुढारी ऑनलाईन : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आमदार राजन साळवी यांची गेले काही दिवसांपूर्वी बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी नोटीस बजावली होती. याप्रकरणी त्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू होती. याप्रकरणी आता त्यांचे कुटुंबीय देखील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB: ANTI-CORRUPTION BUREAU) रडारावर आहे. साळवी यांच्या कुटुंबातील तीन व्यक्तींना एसीबीकडूनबेहिशोबी मालमत्ता प्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. याप्रकरणात साळवी यांच्या कुटुंबाला सोमवारी (दि. २०) चौकशीला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. याविषयी माध्यमांना प्रतिक्रिया देताना आमदार राजन साळवी हे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. (maharashtra politics)

माध्यमांशी बोलताना आमदार राजन साळवी यांनी त्यांची पत्नी, मोठा भाऊ आणि वहिनीला देखील एसीबीची नोटीस आल्याची माहिती  दिली आहे. याप्रकरणी त्यांची २० मार्चला एसीबीकडून चौकशी होणार आहे. त्यामुळे माझ्या कुटुंबियांना २० मार्चला सकाळी ११ वाजता अलिबाग कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे नोटिसात सांगण्यात आले असल्याची माहिती साळवी यांनी माध्यमांना दिली. गेल्या दोन महिन्यांपासून राजन साळवी एसीबीच्या (maharashtra politics) रडारवर आहेत. आतापर्यंत तीन वेळा राजन साळवी अलिबागच्या एसीबी कार्यालयात हजर राहिलेले आहेत.

maharashtra politics: कुटुंबियांना नाहक त्रास; साळवी भावूक

कुटुंबियांना आलेल्या एसीबी नोटीशीवर माध्यमांना प्रतिक्रिया देताना साळवी म्हणाले, मी काय आहे हे माझ्या संपूर्ण मतदारसंघाला आणि जिल्ह्याला माहित आहे. आमच्या अनेक नेत्यांना अशा नोटीसा आल्या आहेत. परंतु भाजपच्या नेत्यांची अनेक प्रकरणे माहित असूनही त्यांना साधी नोटीसही (maharashtra politics) पाठवली जात नाही. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. सर्व तपास यंत्रणा त्यांच्या हातात आहेत, म्हणून आम्हाला आणि आमच्या कुटुबियांना अशाप्रकारचा नाहक त्रास दिला जातोय. हे निषेधार्थ आहे. पण कुठल्याही चौकशीला मी घाबरणार नाही. एसीबीच्या चौकशीला आम्ही सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे साळवी यांनी म्हटले आहे. (maharashtra politics)

हेही वाचा:

Back to top button