उंडवडी : उन्हाळ्यापेक्षा महागाईच्या झळात होरपाळताहेत सामान्य | पुढारी

उंडवडी : उन्हाळ्यापेक्षा महागाईच्या झळात होरपाळताहेत सामान्य

उंडवडी; पुढारी वृत्तसेवा : दिवसेंदिवस वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. ऐन उन्हाळयात घरगुती
गॅसनेही अकराशे रुपयांचा टप्पा पार केल्याने सर्वसामान्य जनता महागाईच्या झळा सोसत असल्याचे चित्र सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पहायला मिळत आहे. शासनाने प्रत्येक जीवनावश्यक वस्तूवर जीएसटी लावल्याने खाण्यापासून ते झोपेपर्यंत माणसाला कर भरावा लागत आहे.

मध्यमवर्ग तसेच सर्वसामान्य नागरिकांना यामुळे महागाईचा सामना करावा लागतअसून, घरखर्च भागविताना सर्वसामान्य नागरिक रडकुंडीला आला आहे. सध्या धान्याच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. बाजरी पंचवीसशे ते तीन हजार रुपये क्विंटल, ज्वारी पस्तीसशे ते चार हजार रुपये, तर गहू 2200 ते 2700 रुपये क्विंटल इतका महाग झाला असल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा भुर्दंड सोसावा लागत आहे. मोलमजुरी करणार्‍यांची यामुळे परवड होत आहे. महागाईच्या झळा सोसत जगावे की मरावे, असा प्रश्न ग्रामीण भागातील नागरिक करत आहेत. शासनाने महागाई कमी करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

Back to top button