जुन्या मोटारींचा महोत्सव | पुढारी

जुन्या मोटारींचा महोत्सव

वॉशिंग्टन : जगभरात अनेक प्रकारचे उत्सव होत असतात. टोमॅटो फेकून मारण्याच्या उत्सवापासून ते चिखलात लोळण्यापर्यंतचेही उत्सव आहेत. मात्र, अमेरिकेत आता एका वेगळ्याच उत्सवाने लोकांचे लक्ष वेधून घेतले. हा उत्सव होता जुन्या मोटारींचा. त्यामध्ये अनेक प्रकारच्या जुन्या मोटारी लोकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आल्या होत्या. त्या पाहण्यासाठी लोकांनी गर्दीही केली होती.

अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांतातील अमेलिया आयलँडच्या गोल्फ क्लबमध्ये नुकताच हा उत्सव सुरू झाला. येथे 28 वा वार्षिक अमेलिया आयलँड कॉनकुअर्स डी एलिगेन्स साजरा करण्यात येत आहे. या उत्सवात जुन्या जमान्यातील अनेक कार प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. ते पाहण्यासाठी सुमारे 25 हजार लोक येथे पोहोचले आहेत.

शोमध्ये 1964 ची फेरारी 250 एलएम आणि वोइसिन सी 25 एरोडाइनला ‘बेस्ट ऑफ शो’चा पुरस्कार देण्यात आला आहे. शिवाय आयोजकांनी चॅरिटीसाठी 1.42 लाख डॉलर (सुमारे 1.16 कोटी रुपये) ची रक्कमदेखील जमा केली आहे.

Back to top button