Supersonic Missile Torpedo: भारतीय नौदलाची ताकद वाढली; ‘सुपरसॉनिक मिसाईल टॉर्पेडो’ची यशस्वी चाचणी | पुढारी

Supersonic Missile Torpedo: भारतीय नौदलाची ताकद वाढली; 'सुपरसॉनिक मिसाईल टॉर्पेडो'ची यशस्वी चाचणी

पुढारी ऑनलाईन डेस्क : सुपरसॉनिक मिसाईल-असिस्टेड रिलीझ ऑफ टॉर्पेडो (SMART) प्रणालीची ओडिशाच्या किनारपट्टीवरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून आज (दि.१) सकाळी ८. ३० वाजता यशस्वीपणे उड्डाण-चाचणी घेण्यात आली. Supersonic Missile Torpedo

SMART ही पुढील पिढीची क्षेपणास्त्र-आधारित हलकी टॉर्पेडो वितरण प्रणाली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे (DRDO) ने डिझाइन करून विकसित केली आहे. हलक्या वजनाच्या टॉर्पेडोमुळे भारतीय नौदलाची पाणबुडीविरोधी युद्ध क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. Supersonic Missile Torpedo

संरक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय नौदलासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेद्वारे क्षेपणास्त्र प्रणाली विकसित केली जाते. सुपरसॉनिक मिसाईल-असिस्टेड टॉर्पेडो (SMART) प्रणाली ही नौदलाची पाणबुडीविरोधी युद्ध क्षमता वाढविण्यासाठी डिझाइन केलेली पुढील पिढीची स्टँड ऑफ टॉर्पेडो वितरण प्रणाली आहे.

मध्यम पल्ल्याच्या सुपरसॉनिक क्षेपणास्त्रामध्ये टॉर्पेडो, पॅराशूट वितरण प्रणाली आणि सोडण्याची यंत्रणा आहे. स्वदेशी सुपरसॉनिक मिसाईल असिस्टेड टॉर्पेडो सिस्टीम (SMART), ज्यामध्ये शत्रूच्या पाणबुड्यांना लक्ष्य करण्यासाठी पारंपारिक टॉर्पेडोपेक्षा खूप मोठी रेंज आहे.

हेही वाचा 

Back to top button