Benefits Of Turmeric Water : हळदीचे पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत फायदे | पुढारी

Benefits Of Turmeric Water : हळदीचे पाणी पिण्याचे 'हे' आहेत फायदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या घरातील मसाल्याच्या डब्यांमध्ये १२ महिने उपलब्ध असणारी हळद खूपचं फायदेशीर आहे. जेवणात, मसाल्यात हळदीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. काही जणांना रात्री झोपताना दुधातून हळद घेण्याची सवय असते. हळदीमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. (Benefits Of Turmeric Water ) चिमुटभर हळदीचे देखील आरोग्यदायी फायदे आहेत. फक्त आपल्याला हळदीचे महत्त्व, फायदे आणि वापर कसा करायचा हे समजून घेतलं पाहिजे. (Benefits Of Turmeric Water )

हळदीची पेटंट लढाई

सांधेदुखीवर सर्वात प्रभावी हळद आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, पचनक्रिया होण्यासाठी, त्वचा गोरी होण्यासाठी, पिंपल्सपासून सुटका मिळवण्यासाठी असे नानाविध फायदे हळदीचे आहेत.

सकाळी रिकाम्या पोटी एका ग्लास पाण्यामधून एक चमचा हळद (भाजलेली) घ्यावे. यामुळे तुमची पाचनशक्ती वाढेल. लघवीला साफ होईल. काही जणांना हळद घेतल्याने पित्त वाढते. अशावेळी हळदीची मात्रा कमी घ्यावी. ज्यांना सांधेदुखी आहे त्यांनी एक ग्लास पाण्यातून हळद टाकून घ्यावी. शरीराला जर सूज असेल तर सूज कमी करण्यासाठीही हळद उपयुक्त आहे.

हळदीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, जे सांधेदुखीच्या वेदना दूर करण्यास मदत करते. एक ग्लास हळदीचे पाणी प्यायल्याने सांधेदुखी दूर राहते. हळदीमध्ये असलेले कर्क्युमिन रोगापासून दूर राहण्यास मदत करते. आपल्याला जखम झाल्यास आपण पटकन हळद लावतो. बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ हळदीसाठी उपयुक्त आहे.

वजन कमी करण्यासाठी महत्त्वाची

हळद कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते. वजन कमी करण्यासाठी हळद महत्त्वाचा पदार्थ आहे. हळदीने पोट साफ होतं. चयापचय वाढवून पचनक्रिया सुधारते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत होते.

चमकदार त्वचेसाठी

हळदीमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात. चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स घालवण्यासाठी दूध-हळदीचा लेप लावला जातो. हळद तुमची त्वचा चमकदार बनवते. वृद्धत्वाची प्रक्रिया मंद करते.

मध आणि हळदीचा वापर

चेहरा चमकदार बनवण्यासाठी हळद आणि मधाचा लेप देखील लावतात. पाण्यातून हळद पिताना थोडेसे मधदेखील घालू शकता.

Back to top button