मैत्रिणीसोबत व्हिडीओ काढून व्यावसायिकाचे शेअर्स लाटले | पुढारी

मैत्रिणीसोबत व्हिडीओ काढून व्यावसायिकाचे शेअर्स लाटले

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मैत्रिणीसोबत असतानाचे व्हिडिओ काढून नातेवाकांनीच एका वयोवृद्ध व्यावसायिकाला धमकावत त्यांच्या नावावर असलेले ०९ कोटी ५६ लाखांचे शेअर्स आपल्या नावावर हस्तांतरीत करुन घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुन्हेगारी स्वरुपाचा कट रचून खंडणीची मागणी केल्याचा गुन्हा दाखल करुन रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस तपास करत आहेत.

प्रभादेवी परिसरात रहात असलेल्या ६९ वर्षीय व्यावसायिकाने याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार, त्यांच्या मालकीची एक गारमेंट कंपनी असून कंपनीचे मुख्यालय शिवडीमध्ये आहे. तर कंपनीचे कारखाने नवी मुंबई आणि कल्याणमध्ये आहेत. या कंपनीत त्यांच्यासह त्यांचे भाऊ मुलगा, चुलत भाऊ, पुतणे असे एकूण ०९ संचालक आहेत. या संचालकांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक वाद आहेत. यात कंपनीसाठी घेतलेले निर्णय, कर्ज, जागा घेणे, फॅक्टरी बांधणे यासाठी झालेला खर्च याचा समावेश आहे. कंपनीने घेतलेले कर्ज कोरोना काळात कंपनी बंद असल्याने हे वाद आणखी वाढले. त्यानंतर, चुलत भाऊ आणि त्यांच्या मुलांकडून शेअर्स आपल्या नावावर करण्यासाठी दबाव टाकला जाऊ लागल्याचे तक्रारदार यांचा आरोप आहे.

तक्रारदार हे शेअर्स नावावर करत नसल्याने नातेवाईकांनी एका महिला कर्मचाऱ्याशी असलेल्या मैत्रिवरुन तक्रारदार यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मात्र तक्रादार यांनी पत्नी आणि मुलाच्या नावावर अस- लेले एकूण ०९ कोटी ५६ लाखांचे १९.५३ टक्के शेअर्स यातील आरोपी नातेवाकांच्या नावावर केले. तरीसुद्धा मैत्रिणीसोबत असताना तक्रारदार यांचे व्हिडीओ काढून त्रास देणे सुरुच होते.

Back to top button