नागपूर: रोशन कांबळे हत्याकांड; ५ जणांना जन्मठेप | पुढारी

नागपूर: रोशन कांबळे हत्याकांड; ५ जणांना जन्मठेप

नागपूर: पुढारी वृत्तसेवा: नागपूर जिल्ह्यातील वाडी दवलामेठी येथील 2014 साली घडलेल्या कुख्यात रोशन कांबळे हत्याकांड प्रकरणी पाच जणांना जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीशांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याशिवाय प्रत्येकी साडे सहा हजार रुपये दंड ठोठावला आहे. दोघांची पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली आहे. अजित रमेश सातपुते (वय 25, रितेश महेश गुप्ता (वय 20), राकेश वाघमारे (वय 22), सुरज प्रदीप कैतवास (वय 22), अमित मनोहर अंडरसहा (वय 20) अशी शिक्षा झालेल्या दोषींची नावे आहेत.

या घटनेची माहिती अशी की, 12 जुलै 2014 रोजी वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दवलामेठी परिसरात रोशन आणि अजित या दोन कुख्यात गुंडांमध्ये झालेल्या हाणामारीत अजित आणि त्यांचे सहा सहकारी व एक अल्पवयीन असे 8 आरोपी रोशनच्या कार्यालयात घुसले. आणि रोशनवर तलवार व तीक्ष्ण शस्त्रांनी हल्ला चढविला. यात गंभीर जखमी अवस्थेत रोशनला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी 6 सज्ञान तर एका अल्पवयीन आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. अल्पवयीनवर बाल न्यायालयात आरोप पत्र दाखल करण्यात आले. सात आरोपींवर खटला चालविण्यात आला. अतिरिक्त सरकारी वकील कल्पना पांडे यांनी सरकारी बाजू मांडली.

हेही वाचा 

Back to top button