नागपूर: भाजप कार्यालयासमोर ‘आप’चे आंदोलन | पुढारी

नागपूर: भाजप कार्यालयासमोर 'आप'चे आंदोलन

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : देशभर मोदी सरकार कडून विरोधकांना, विरोधी पक्षाच्या सरकारला सीबीआय, ईडी किंवा केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून कमजोर करण्याचा सातत्याने देशभर कार्यक्रम चालू आहे. दिल्लीत सीबीआयच्या माध्यमातून दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना विनाकाराण अटक करण्यात आली. याचा निषेध म्हणून गणेश पेठेतील नागपूर शहर भाजप कार्यालयासमोर जगजीत सिंग व डॉ. देवेंद्र वानखडे यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले.

यावेळी मोदी सरकार हाय-हाय अशी घोषणाबाजी करण्यात आली. हाती पिंजरे घेत तानाशाही नाही, चलेगी असा इशारा देत भाजप सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या कारवाई विरोधात देशभर आपने काळा दिवस पाळला. आरोग्य, शिक्षण क्षेत्रात आपने केलेल्या कामामुळे भाजपला भीती वाटते. दिल्लीत होऊ शकते, मग महाराष्ट्रातही ते होऊ शकते. हेच भाजपच्या डोळ्यात खुपते, अदानी प्रकरणी झालेला घोळ दुर्लक्षित करण्यासाठीच हे सर्व खटाटोप सुरू आहेत, असा आरोप यावेळी करण्यात आला.

आंदोलनात प्रामुख्याने राष्ट्रीय परिषद सदस्य अमरीश सावरकर, शहर संघटन मंत्री शंकर इंगोले, सचिव भूषण ढाकुलकर, उपाध्यक्ष डॉ. शाहिद अली जाफरी व राकेश उराडे, उत्तर नागपूर संयोजक रोशन डोंगरे, पश्चिम नागपूर संयोजक अभिजीत झा, दक्षिण नागपूर, संयोजक मनोज डफरे, दक्षिण पश्चिम संयोजक अजय धर्मे, युवा राज्य समिती सदस्य कृतल आकरे आदी उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button