पिंपरी : कोण बाजी मारणार? चिंचवडच्या निकालाविषयी कार्यकर्त्यांकडून दावे-प्रतिदावे | पुढारी

पिंपरी : कोण बाजी मारणार? चिंचवडच्या निकालाविषयी कार्यकर्त्यांकडून दावे-प्रतिदावे

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीसाठी रविवारी (दि.26) मतदान झाले. चिंचवडच्या मैदानात कोण बाजी मारणार? यावरून शहरभरात चर्चा रंगली आहे. विजयावरून उत्साही कार्यकर्त्यांकडून वादे-प्रतिदावे केले जात आहेत. नागरिकांमध्ये त्याची उत्सुकता ताणली गेली आहे.

मतदारसंघातील 5 लाख 68 हजार 954 पैकी 2 लाख 87 हजार 145 मतदारांनी मतदान केले. मतदानाचे हे प्रमाण 50.47 टक्के आहे. मतदानाची प्रभागनिहाय आकडेवारी वृत्तपत्रात आज प्रसिद्ध झाली आहे. कोणत्या भागात वाढीव मतदान झाले. कोठे मतदारांनी पाठ फिरवली. त्या मतांच्या आकडेवारीवरून विविध अंदाज बांधले जात आहेत. चौकाचौकांत त्यावर चर्चा रंगत आहेत.

कार्यकर्ते, समर्थक, सामाजिक कार्यकर्ते व राजकारणांची आवड असलेले व्यक्ती मतांच्या आकडेवारीवरून अंदाज बांधले जात आहेत. एकमेकांना भेटल्यानंतर तसेच, फोनवरील चर्चेत कोण जिंकणार, असा प्रश्न केला जात आहे. आपला उमेदवार कशा जिंकणार हे उत्साही कार्यकर्ते व समर्थक छातीठोकपणे सांगत आहेत. त्यासाठी विविध उदाहरणे देऊन पटवून देत आहे. तसेच, महापालिका वर्तुळातही अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये निकालावरून उत्सुकता ताणली गेली आहे

Back to top button