पुणे: खेड-शिवापूरमार्गे सिंहगड बस सुरू करण्याची मागणी… | पुढारी

पुणे: खेड-शिवापूरमार्गे सिंहगड बस सुरू करण्याची मागणी...

खडकवासला (पुणे), पुढारी वृत्तसेवा: स्वारगेटवरून कात्रज, खेड -शिवापूरमार्गे सिंहगड घाटरस्त्याने कोंढणपूर, अवसरवाडी फाटा ते डोणजे, खडकवासला ते पुणे, अशी गोलाकार बस सेवा पीएमपीने सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

हवेली तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब पारगे यांनी याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. अरुंद घाटरस्त्यामुळे सिंहगड किल्ल्याच्या घाटरस्ता मार्गावर कोणत्याही प्रकारची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने स्थानिक रहिवाशांना गैरसोय सहन करावी लागत आहे. अलीकडच्या काळात कोंढापूर फाट्यापर्यंत घाटरस्ता प्रशस्त करून काँक्रीटीकरण तसेच डांबरीकरण करण्यात आले आहे. तेथून डोणजेपर्यंतचा रस्ताही प्रशस्त करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गाने सार्वजनिक बससेवा सुरू केल्यास स्थानिक रहिवाशांसह पर्यटकांचीही सोय होईल. कोंढापूर फाट्यापासून गडावर जाणारा रस्ता अनेक ठिकाणी अरुंद आहे. कोंढापूर फाटा मार्गे वर्तुळाकार बससेवा सुरू केल्यास पर्यटनाला चालना मिळणार असल्याचे पारगे यांनी सांगितले.

Back to top button